सात अधिका-यांची चौकशी सी बी आय कडुन करन्याची रिपाईची मागणी
पारनेर/प्रतिनिधी /- जिल्हयात दलितांवर अत्याचाराचे गुन्हे वाढत असताना नितीन आगेच्या हत्येतील आरोपी निर्दोष सुटतात ही बाब धक्कादायक आहे जर याकडे दुर्लँक्ष केले तर येणा-या काळात सागर शेजवळ,सोनई हत्याकांड,अमोल वाघमारे, राहुल शिंदे यांना देखील न्याय मिळणार नाही.
त्यामुळे नितीन आगे प्रकारणात ज्या सात अधिकारी यांनी तपासात व जबाबदारीत हलगर्जीपणा केला आहे.त्यांवर कडक कारवाई व्हावी यासाठी ही चौकशी सी बी आय कडे देण्यात यावी. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. असे निवेदन रिपाई(आठवले गट) चे तालुकाध्यक्ष राजुभाउ उबाळे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला देण्यात आले.
यावेळी रिपाई राज्य नेते रमेशराव गायकवाड,बाळासाहेब नगरे,राजु उबाळे,प्रल्हाद शिंदे,सचिन नगरे,बाळासाहेब कांबळे,आशाताई शिंदे,प्रणव भालेराव,दिनेश मुरकुटे,अतुल सोनवणे,तुषार साळवे,संतोष शिंदे,धनाजी मोरे ,प्रमोद शिंदे,गंगाराम गायकवाड,आवेश आढाव,अविनाश भिंगारदिवे,आदि मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.