नाशिक विभागात आयइडीएसएस योजनेतील बोगस लाभार्थ्यांची दुकानदारी
केंद्र शासनाने यापुर्वी एकात्मिक अपंग समावेशीत शिक्षण योजना सुरू केली होती.२००९ -१० मध्ये ही योजना बंद करून inclusive education for disabled at secondary stage म्हणजे केंद्रीय समायोजीत दिव्यांग शिक्षण ही नवी योजना सुरू केली .जुन्या योजनेतील शिक्षक आणि लाभार्थी विद्यार्थ्यांना या नव्या योजनेत समावेशीत करून घेतले.
या योजनेचा अंमल करतांना व्यवस्थेतील काही झारीतील शुक्राचार्यांना हाताशी धरून बोगस प्रवृत्तींनी बनावट कागदपञांच्या आधारे स्वतःला शिक्षक म्हणून या योजनेत नोंदवून घेतले.अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष काम न करता,काही ठिकाणी संस्थाही अस्तित्वात नसतांना या योजनेतून लाखो करोडो रूपये लुटण्याचा गोरख धंदा सुरू केला.
या योजनेत शिक्षक म्हणून काम करीत असलेले एक महारथी एका राञीत या योजनेचे संचालक झाले.या योजनेत हा एक चमत्कार मानला जातो आहे.याच शिक्षक वजा संचालकांच्या मेहरबानीने या योजनेत तब्बल ८४० शिक्षक बोगस असल्याचे सिध्द झाले असून आजपर्यंत योजनेतील कोट्यावधी रूपये या बोगस शिक्षकांनी पगारापोटी लुटले आहेत.
धुळे जिल्ह्यात या बोगस जातकुळीतील सहा शिक्षक निष्पन्न झाले असून त्यांनी बनावट कागदपञांच्या आधारे लाखो रूपये हडप केले आहेत त्याचे सर्व साधार पुरावे शासन दरबारी सादर करूनही शासनस्तरावर कारवाई करण्याचे धाडस व्यवस्था दाखवित नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
धुळे जिल्ह्यातील या योजनेशी संबंधित त्या सहाही शिक्षकांनी शासनाची फसवणूक केली आहे,हे शिक्षक ज्या संस्थेत या योजने अंतर्गत काम करण्याचा दावा करतात त्या संस्थांनी अशी योजना या संस्थेत एक तर राबविली जात नाही किंबहूना त्यांच्या संस्थेशी या शिक्षकांचा दुरान्वयेही संबंध नसल्याचा लेखी खुलासा संस्था चालकांनी केला आहे.एका महाभाग बोगस शिक्षकाने तर आपले निर्दोषीत्व सिध्द करण्यासाठी चक्क एका एनजीओचे प्रमाणपञ सादर केले आहे.
हे महाशय काम करीत असलेल्या म्हणजे पगार पञकात त्यांनी नमूद केलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकाच्या शिफारशी ऐवजी एका एनजीओच्या मुख्याध्यपकाची शिफारस जोडून अकलेचे कांदे सोलले आहेत.शाळेला मुख्याध्यापक असतो हा सर्वसाधारण समज जनमानसात रूढ असताना या विद्वान बोगस शिक्षकाने एनजीओत मुख्याध्यापक पदाची निर्मिती करण्याचा जावई शोध लावला आहे.
अशी माहीती उपलब्ध झाली आहे.शासनाची कोट्यावधीची लुट करून लाभार्थी विशेष विद्यार्थ्यांची फसवणूक करणार्या या भामट्या सरकारी दरोडेखोरांना धडा शिकवण्याच्या हेतूने शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीच्या सुनावणीतही हे सहा शिक्षक बोगस निष्पन्न होऊन दोषी ठरले आहेत.या सहा शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारसही शिक्षण उपसंचालकांनी आपल्या आदेशात केली आहे.
अशी माहीती उपलब्ध झाली आहे.शासनाची कोट्यावधीची लुट करून लाभार्थी विशेष विद्यार्थ्यांची फसवणूक करणार्या या भामट्या सरकारी दरोडेखोरांना धडा शिकवण्याच्या हेतूने शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीच्या सुनावणीतही हे सहा शिक्षक बोगस निष्पन्न होऊन दोषी ठरले आहेत.या सहा शिक्षकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शिफारसही शिक्षण उपसंचालकांनी आपल्या आदेशात केली आहे.
दरम्यान गुन्हा दाखल करण्याची शिफारस करणारे शिक्षण उपसंचालक कार्यालय या दोषींविरूध्द सु मोटो कारवाई का करीत नाही असा सवाल उपस्थित केला जातोय.या प्रकरणात शासनाची फसवणूक झाली आहे.शासनाच्या निधीचा अपव्ययवजा अपहार झालेला असतांना खासगी व्यक्तीला गुन्हा दाखल करण्याची शिफारस शिक्षण उपसंचालक कार्यालयाने करण्यामागचे इंगीत काय? या प्रश्नाला उत्तर अद्याप मिळाले नाही.
धुळे जिल्ह्यातील हे सहा शिक्षक पांढरपेशा लुटारूंचे प्रतिनिधीत्व करीत असून नाशिक, अहमदनगर,जळगाव आणि नंदूरबार सारख्या जिल्ह्यांमध्येही असे बोगस युनीट बोगस शिक्षक असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्यांचा शोध कुणी घ्यायचा हा खरा सवाल आहे.