Breaking News

मुंबई शहर इलाखा साबां भ्रष्टाचाराचा आयकान

दादा मंञ्यांकडून अनोखा महिला सन्मान 

मुंबई (विशेष प्रतिनिधी), दि. 02, नोव्हेंबर - भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या सार्वजनिक बांधकाम खात्यात मुंबइ साबां मंडळ  आयकानम्हणून ओळखले जात असून महिला अ भियंत्यांचा भ्रष्टाचार लपविण्याच्या फंदात साबां मंञ्यांनी आपल्या सरकारची विश्‍वासार्हता पणाला लावल्याची चर्चा प्रशासनात सुरू आहे. दरम्यान कोल्हापुरी लाल मातीचा स्वाभीमान  भ्रष्टाचाराला थेट शरण गेल्याने फडणवीस सरकारच्या पारदर्शकतेची प्रज्ञा संशयाच्या घेर्यात सापडली आहे.
आ.चरण भाऊ वाघमारे, भरतशेठ गोगावले, प्रशांत बंब अशा काही लोकप्रतिनिधी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढल्या नंतर सार्वजनिक बांधक ाम मंञ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍न चिन्ह उपस्थित होऊ लागले.
विशेषत ः मनोरा आमदार निवास इमारतीच्या कामांत झालेला पाच कोटींचा गैरव्यवहार आ.चरणभाऊ वाघमारे यांच्या पाठोपाठ भरतशेठ गोगावले यांनी उघड केल्या नंतर साबां  मंञ्यांच्या कार्यक्षमतेची खरी कसोटी लागली. या कसोटीत कोल्हापुरच्या लाल मातीत कसलेला स्वाभीमानी पहिलवान सपशेल नापास झाल्याचे आजवरच्या घडामोडींवरून दिसते.एका  महिला अभियंत्यांने केलेली अक्षम्य चुक सावरण्याचा नाद या साबां मंञ्यांच्या स्वाभीमानाला कलंकीत करून गेलाच शिवाय पारदर्शक कारभाराची देवेंद्र  फडणवीस यांची मनिषा  धुळीस मिळविण्यासही कारणीभूत ठरला.
लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात धुळ फेकून न केलेल्या कामांची देयके मंजूर केली.काही कामांना मंजूरी नसतांना ती कामे केल्याची नोंद करून ,मःजूरी एका ठिकाणी काम दुसर्या  ठिकाणी, हे सारे दडविण्यासाठी गैरव्यवहाराची वाच्यता झाल्यानंतर एम बी मध्ये खाडाखोड करून पुरावे नष्ट करून, आरोपाची तिव्रता कमी करण्यासाठी स्वतःच्या लाभात नोंदी क रण्यासारखा गंभीर गुन्हा केलेल्या महिला कार्यकारी अभियंत्याला वाचविण्यासाठी विद्यमान साबां मंञ्यांनी आपली राजकीय कारकिर्द पणाला लावल्याने हा मुद्दा साबांत खुमासदारपणे  चर्चेत आहे.
आ. चरण वाघमारे यांनी टप्प्याटप्याने या संदर्भात तक्रार केली. मुख्यअभियंता,प्रधान सचिव,साबां मंञी या पातळीवर कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने आ. वाघमारे यांनी थेट  मुख्यमंञ्यांची भेट घेऊन हा गैरव्यवहार कथन केला.मुख्यमंञ्यांनी जनतेला दिलेल्या पारदर्शक कारभाराच्या वचनाला जागत तात्काळ चौकशीचे आदेश दिले. या आदेशाबर हुकुम  प्रधान सचिवांच्या निर्देशाप्रमाणे अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी आपले चौकशीचे कर्तव्य  पार पाडले.
अरविंद सुर्यवंशी यांनी चौकशी करून सादर केलेल्या अहवालात तत्कालीन कार्यकारी अभियंता श्रीमती प्रज्ञा वाळके यांना जबाबदार धरले आहे.या अहवालात नमूद केल्याप्रमाणे आ.  अमोल महाडीक यांच्या सदनिका क्र.मनोरा ए-11या कक्षात मुळ अंदाजपञक व निविदेप्रमाणे कामे करण्यात आलेली नसतांना या न केलेल्या कामापोटी तब्बल 8 ,83,402  प्रमाणक क्रमांक 87 माहे 2/2016 अन्वये अदा केले आहे. आ. महेश लांडगे यांच्या सदनिका क्र.मनोरा सी-122 मध्ये हाच फंडा वापरून प्रमाणक क्र. 90 माहे 8/2016 अन्वये  8, 79, 781 चे देयकं अदा केले आहेत.
हे अधिक्षक अभियंत्यांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. शहर इलाखा विभागाच्या तत्कालीन कार्यकारी अभियंता श्रीमती प्रज्ञा वाळके, सह अभियंता धोंडगे आणि फेगडे यांना या प्रक रणी जबाबदार धरण्यात आले आहे. यावरून या तिघांचाही या गैरव्यवहारात सारखा सहभाग असतांना किंबहूना या विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके  यांच्यावर विशेष जबाबदारी असतांना न्यायोचित कारवाई होणे अपेक्षित होते. ताथापि सह अभियंत्यांना निलंबीत करून बाईंना वाचविण्यात साबां मंञ्यांनी आपले वजन खर्ची  घातल्याची चर्चा साबांत आहे.
राजकारणात विशेषत ः भाजपात आणि सरकारमध्ये खास स्थान असलेले साबां मंञी प्रशासनातील एका महिला अधिकार्याच्या भ्रष्ट कारनाम्यांना पाठीशी घालून आपल्या प्रतिष्ठेची क सोटी का बघतात? हे न उलगडणारे कोडे ठरले आहे.हे रहस्य कोल्हापुरच्या लाल मातीच्या स्वाभीमानाला डिवचणारे आहेच शिवाय या प्रवाहात सरकारची पारदर्शकताही वाहून  जाण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
.....ही तर साबां श्रींची इच्छा !
श्रीमती प्रज्ञा वाळके यांच्यावर कारवाई होऊ नये साबां श्रीं चीच इच्छा असेल तर प्रशासनातील बिचारी प्रजा काय करणार अशी उपहासात्मक चर्चा ऐकायला मिळत आहे.महिलांना  प्राधान्य द्यावे हे आपले धोरण आहे.महिलांना सन्मान मिळायला हवा हे महाराष्ट्राचे श्री छञपतींनीही सांगीतले आहे. याचा दुरार्थ घेऊन विद्यमान साबां मंञी महिला सन्मानाच्या  नावाखाली भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत असल्याच्या संतप्त भावना व्यक्त केल्या जात आहेत.
अधिक्षक अभियंत्यांचे ते पञच देते पुरावा
मनोरा आमदार निवास इमारतीच्या गैरव्यवहारात अडकलेल्या कार्यकारी अभियंत्यांना वाचविण्यासाठी साबांची अवघी यंञणा दररोज वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवित आहेत.यावर अ धिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी बुधवारी आ. चरणभाऊ वाघमारे यांना उत्तरादाखल दिलेल्या पञाने शिक्कामोर्तब केले आहे.या सर्व खेळाची सुरूवात अधिक्षक अभियंता  सुर्यवांशी यांनी आक्टोबरच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी आमदार कक्षात चरणभाऊंची भेट घेत कार्यकारी अभियंत्यांची रदबदली करून केली याचा धडधडीत पुरावा ठरणारे हे पञ  शहर इलाखा विभागातील भ्रष्टाचाराला पाठीशी घालीत आहे.काय आहे हे पञ?