Breaking News

निकाला विरोधात शासन हायकोर्टात याचिका दाखल करणार:


जामखेड ता.प्रतिनिधी - - जामखेड तालुक्यातील खर्डा येथील नितीन आगे खून प्रकरणी निर्दोष मुक्तता झालेल्या निकाला विरोधात शासन हायकोर्टात याचिका दाखल करणार. या पुढे अनु,जाती जमाती आयोग व शासन कुठेही कमी पडणार नाही. असे आश्वासन अनु,जाती जमाती चे अध्यक्ष के. सी. थूल.यांनी दिले . त्यांनी खर्डा येथे मयत नितीन आगे यांच्या कुटुंबाला भेट दिली.

ते बोलताना म्हणाले की, मी नामांकित वकील देऊन सरकार अपील करणार, आगे कुटुंबीयांना पोलिस संरक्षण दयायला सांगणार, राजू आगे यांना शस्त्र परवाना देण्यासाठी प्रयत्न करणार, दरमहा पाच हजार रूपये पेन्शन साठी पाठपुरावा करणार, त्यांना राहण्यासाठी घरकुल मंजूर करून देणार . याप्रसंगी खासदार अमर साबळे ,अप्पर पोलीस अधीक्षक पाटील ,समाज कल्याण उपायुक्त वाबळे ,आर,पी,आय,जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे,पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम,मनिष साठे,उपस्थित होते, आगे कुटुंबाला शासकीय घरकुल,पेन्शन,जमीन,कुटुंबातील सदस्यला नोकरी,तसेच शासकीय पोलीस संरक्षण ताबडतोब दिले जाईल. 

तसेच फितूर साक्षीदार यांच्या वर कारवाई करण्यात येईल. असे त्यांनी यावेळी सांगितले, तसेच खासदार अमर साबळे यांनी नितीन आगे खून प्रकरणी न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असून सी. बी. आय. चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

या वेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार भंडारी,पोलीस उपनिरीक्षक सहारे, तसेच तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, रिपाइंचे युवा नेते सतीश साळवे ,शिवाजी साळवे,शहाजी पैठणपगार,बबन सदाफुले,संतोष पगारिया,बापू जावळे, देविदास साळवे, यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.