पारनेर येथे गणित विज्ञान प्रदर्शनाला सुरुवात, आमदार औटी यांच्या हस्ते झाले प्रदर्शनाचे उद्घाटन
आमदार विजय औटी म्हणाले की जगाच्या पाठीवर दैनंदिन होत असलेले बदल माणसांमध्ये उपजत असलेली शक्ती आणि शक्तीच्या माध्यमातून आपल्या मेंदूमध्ये होत असणारी खळबळ यातून होत असलेले मत व्यक्त करण्यासाठी विज्ञान प्रदर्शन हे चांगले व्यासपीठ आहे, सध्या विज्ञानाची प्रगती कोणीही रोखू शकत नाही .
पण विज्ञानाच्या न रोखता येणाऱ्या प्रगतीमध्ये ग्रामीण भागातील मुलं मुली गेली नाही. तर त्या विज्ञान प्रदर्शनाचे फायदे शहरातील मर्यादित लोकांपर्यंत राहतील . म्हणून असं ग्रामीण भागातील प्रदर्शन खूप महत्त्वाच आहे,विज्ञान दिन प्रतिदिन त्यांच स्वरूप बदलत आहे जगाच्या पाठीवर अनेक देशांनी विज्ञानामध्ये मोठी भरारी घेतलेली आहे . आपलं गणित विज्ञान प्रदर्शन सगळ्या तालुक्यांपेक्षा उजव झालं पाहिजे.
या प्रदर्शनासाठी जवळपास तालुक्यातील १५० शाळांनी सहभाग नोंदवला असून ३५२ उपकरणे विद्यार्थ्यांनी प्रदर्शनात मांडली आहेत बुधवारी तालुक्यातील सर्वच शाळेतील विद्यार्थी प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी करतील असं प्राचार्य मुकुंद जासूद यांनी सांगितले यावेळी बाळासाहेब करंजुले समन्वयक,गणित विज्ञान संघटनेचे अध्यक्ष प्रवीणचंद्र गुंजाळ, सचिव सोपान गवते चंद्रशेखर ठुबे धनंजय घोलप,रविंद्र दाते,जालिंदर झावरे आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.