लोणारमध्ाून अपहरण केलेल्या इसमाला दिले सोडून!
बुलडाणा, दि. 06, नोव्हेंबर - शहरातील जितेश जनरल स्टोअर्स समोर उभे असलेल्या हनुमान डाखोरे वय 38 रा.पहूर ता.लोणार यांना अज्ञातानी 3 नोव्हेंबर रोजी अंदाजे 4 वाजून 30 मिनिटांनी सिल्व्हर रंगाच्या क्रुझर गाडीत बळजबरी कोंबून अपहरण करत हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील भंडारी पाटी येथे नेले. पंरतु चुकीच्या इसमाचे अपहरण केल्याचे लक्षात येताच अपहरणकर्त्यांनी डाखोरे यांच्या जवळील पैसे काढून घेत भंडारी पाटीवरच सोडून दिले. सदर घटनेबाबत डाखोरे यांनी लोणार पोलीस स्टेशन फिर्याद दिली असता लोणार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र माळी यांनी तपास चक्रे वेगात फिरवत अवघ्या सहा तासात अपहरणकर्त्यांना गजाआड केले .
तालुक्यातील पहूर येथील हनुमान डाखोरे आपल्या दुचाकीसह शहरातील जितेश जनरल स्टोअर्स समोर उभे होते. दुपारी अंदाजे 4 वाजून 30 मिनिटांनी गावाकडे जाण्याच्या तयारीत असलेल्या डाखोरे यांना अज्ञात इसमांनी सिल्व्हर रंगाच्या क्रुझर गाडी क्रमांक एम.एच.38.जे.3332 गाडीत बळजबरी कोंबले . अपहरणकर्त्यांनी गाडी भरधाव वेगाने पळवत पांग्रा डोळे,टिटवी,नांद्रा,रायगाव मार्गे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील भंडारी पाटी येथे नेले . रस्त्याने जात असताना अपहरण कर्त्यांनी तुमच्या दुचाकीवर चक्र आहे का व नावाबाबत माहिती घेतली. त्याची खातरजमा करत त्यांची दुचाकी एका इसमद्वारे भंडारी पाटीवर नेण्यात आली. भंडारी पाटीवर अपहरणकर्त्यांनी हनुमान डाखोरे यांची संपूर्ण चौकशी केली असता चुकीच्या इसमाचे अपहरण झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी डाखोरे यांच्याजवळील 30 हजार रुपये घेऊन त्यांना भंडारी पाटी वरच सोडून दिले. हनुमान डाखोरे यांनी कसेबसे लोणार गाठले. दरम्यान अपहरकर्त्यांनी डाखोरे यांना सुखरूप घरी पोहचले की नाही याबाबत विचारणा केली. याबाबत हनुमान डाखोरे यांनी 3 नोव्हेंबर रोजी रात्री लोणार पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली असता पोलीस निरीक्षक राजेंद्र माळी यांनी वेगाने तपास चक्रे फिरवत अपहरणकर्ते सखाराम जाधव ( रा माळातोंडी ता.मंठा हल्ली मुक्काम नामदेव नगर ,जिंतूर), अरुण सारंग सातव (रा.दिवसळी,ता.जिंतूर), ज्ञानेश्वर उत्तमराव देशमुख (रा.आदर्श कॉलोनी, ता.जिंतूर), संतोष गंगाधर वाकुडकर (साई नगर, जिंतूर), गजानन महादेव वाघमारे (रा.जिंतूर), विशाल गणेश आव्हाळ (रा.जिंतूर) यांना अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र माळी, पोलीस उपनिरीक्षक थोरात हे.कॉ.गजानन तायडे, चंद्रशेखर मुरुडकर करीत आहे.