मेहकर काँग्रेस कमिटीच्या वतीने एम.एस.ई.बी.च्या विरोधात आंदोलन
बुलडाणा, दि. 06, नोव्हेंबर - शासनाने नुकताच विद्युत पंपाचे बिल न भरणार्या शेतकर्यांचे कनेक्शन तोडण्याचे शडयंत्र रचले जात आहे. त्या विरोधात काँग्रेस कमिटीच्या वतीने देवानंद पवार यांच्या नेतृत्वात, शासनाच्या निर्णयाविरोधात निदर्शने केली. विजबिल भरण्याच्या नावाखाली तालुक्यातील अनेक डिपी रोखून धरण्यात आले आहे. तालुक्यातील रायपूर रोहित्राच्या बाबतीत राजकारण होत आहे. सहा महिण्यापासून ते राहित्र तळाल्याने 50 हेक्टर जमीनीवरिल हरभरा पेरणी उलटण्याच्या मार्गावर आहे. सध्या सोयाबिन, तुर, कापूस या पिकांना भाव नाही दुष्काळ परिस्थीती आहे. त्यामुळे सक्तीने पंपाचे विद्युत कनेक्शन तोडू नये तसेच तात्काळ शेतकर्यांना रोहित्र उपलब्ध करुन देण्यात यावे. यासाठी एमएसीबीच्या अधिकार्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे शाम उमाळकर, तालुका अध्यक्ष देवानंद पवार, लक्ष्मन घुमरे, संजय बावस्कर, युनुस बागवान, संजय सुळकर, शंकर सपकाळ, आल्हाट, गणेश अक्कर, वजीम कुरेशी, देशमुख बापू उपस्थित होते.