Breaking News

दहावी परीक्षेची आवेदनपत्र ऑनलाईन सादर करण्याच्या मुदतीत वाढ

जळगाव, दि. 10, नोव्हेबर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांचे मार्फत मार्च 2018 मध्ये घेण्यात येणा-या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10  वी) परीक्षेस नियमित प्रविष्ट होणारे विद्यार्थी, यापूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले पूर्वीचे खाजगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणारे विद्यार्थी व तुरळक विषय घेऊन  प्रविष्ठ होणारे विद्यार्थी यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने भरण्यास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे.
आवेदन पत्रे www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भरावयाची असून त्यांच्या सुधारित वाढीव याप्रमाणे -
माध्यमिक शाळांनी ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्रे भरावयाच्य तारीख नियमित शुल्कासह 14 नोव्हेंबर 2017 पर्यंत, विलंब शुल्कासह - 15 ते 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत आहे.  माध्यमिक शाळांनी बॅकेत चलनाव्दारे शुल्क भरावयाच्या तारीख 7 नोव्हेंबर 2017 ते 1 डिसेंबर 2017 पर्यंत आहे. तर माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या  चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करावयाची तारीख शुक्रवार दि. 8 डिसेंबर 2017 पर्यंत आहे.
15 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2017 या कालावधीत शाळांनी विद्यार्थ्यांच्या याद्या एुलशश्र मध्ये प्रिटींग कराव्यात. परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्किारण्यात येणार  असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे भरण्यासाठी आपल्या शाळेशी संपर्क साधावा. ऑनलाईन आवेदपत्रे भरताना येणा-या अडचणीबाबत मुख्याध्यापकांनी संबंधित विभागीय मंडळाशी  संपर्क साधावा. शासन निर्णयानुसार ऑनलाईन आवेदनपत्रे भरतांना विद्यार्थ्यांचे जन्मठिकाण नमूद करण्याची कार्यवाही शाळांनी ऑनलाईन प्रक्रियेमध्ये करावी.
लातूर व कोकण विभाग वगळून इतर विभागीय मंडळातील शळांनी प्रचलित शुल्क बॅक ऑफ इंडियात मंडळाच्या खात्यामध्ये जमा करुन बँक ऑफ इंडियाची चलनाची प्रत व  विद्यार्थ्याच्या याद्या दिलेल्या मुदतीत विभागीय मंडळाकडे सादर कराव्यात.
इयत्ता 10 वीची आवेदनपत्रे भरतांना आधारकार्ड क्रमांक नमूद करण्याबाबत अनिवार्य केलेले असले तरी एखाद्या विद्यार्थ्याकडे आधारकार्ड नोंदणी केलेली असेल तर नोंदणी क्रमांक  देखील ग्राहय धरण्यात येईल. नोंदणी देखील केलेली नसेल तर निकालापर्यंत आधारकार्ड काढण्यात येईल. असे विद्यार्थ्याने प्राचार्य, मुख्याध्यापकांना लेखी हमीपत्र देणे आवश्यक  आहे. आधार कार्ड क्रमांक नाही म्हणून आवेदनपत्र भरणे नाकारता येणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी