Breaking News

मातीच्या ढिगा-याखाली दबून मजुराचा मृत्यू; दोन मजूर जखमी

जळगाव, दि. 10, नोव्हेबर - जळगाव तालुक्यातील निमखेडी शिवारात मातीच्या ढिगार्‍याखाली दाबून एका मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोन मजूर जखमी झाल्याची घटना  आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास येथे घडली. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत मजुरांच्या नातेवाईकांचा आक्रोश मन हेलावणारा होता. याप्रकरणी तालुका पोलिसात अक स्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथील रवींद्र अशोक अहिरे (वय 32) या मजुराचा मातीच्या ढिगा-याखाली दबून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना  निमखेडी शिवारात सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत एकनाथ अर्जुन साळुंखे (वय 32 व रमेश साळुंखे (वय 30) हे दोघं मजुर किरकोळ जखमी झाले आहेत.
रवींद्र ज्या मालकाकडे कामाला होता त्याला तातडीने येथे आणून कारवाई करा म्हणून नातेवाईक संतप्त झाले होते. पोलिसांनी धीर देत त्यांची समजूत घातली. पोलिसांकडून  घटनास्थळाची पाहणी घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, सहायक निरीक्षक सचिन बागुल, जितेंद्र पाटील, प्रफुल्ला धांडे यांनी घटनास्थळी भेट दिली.  घटनास्थळावर एकही वाहन आढळून आले नाही. घटनास्थळाचा पंचनामा करुन जिल्हा रुग्णालयातही मृतदेहाचा पंचनामा केला. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली  आहे.त्यातच रूग्णालय परिसरात नातेवाईकांसह मजुरांची चांगलीच गर्दी जमली होती.