Breaking News

कोल्हेवाडीच्या उपसरपंचपदी संजय कोल्हे

संगमनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील राजकीयदृष्टया प्रतिष्ठेच्या असलेल्या शिर्डी मतदार संघातील कोल्हेवाडी उपसरपंचपदाच्या निवडणुकीत उपसरपंचपदी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या गटाचे संजय कोल्हे विजयी झाले आहे. थोरात गटाचे नेतृत्व अमृतवाहिनी बँकेचे उपाध्यक्ष व नवनिर्वाचित सरपंच दत्तात्रय खुळे यांनी केले. विखे गटाचे नेतृत्व भास्करराव दिघे यांनी नेतृत्व केले. 


सरपंच दत्तात्रय खुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणुक पार पाडली. यावेळी नवनिर्वाचित सदस्य अनिल खुळे, मनिषा खुळे, विमल खुळे, मंदा कोल्हे, मंगल कोल्हे, अशोक दिघे, विठ्ठलबाबा खुळे, रंगनाथ खुळे, शिवाजी खुळे, किरण खुळे, रामदास खुळे, दादासाहेब जगताप, दादासाहेब गुंजाळ, नानासाहेब खुळे, पांडुरंग खुळे, मधुकर खुळे, पांडुरंग कोल्हे, प्रकाश कोल्हे, विलास कोल्हे, बाबासाहेब वामन, संजय दिघे, लक्ष्मण दिघे, विजय खुळे, बाळासाहेब दिघे, दिनकर कोल्हे, संजय कोल्हे, अनिल वामन आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

या निवडीबद्दल आ. बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, सत्यजित तांबे, रणजितसिंह देशमुख, बाबा ओहळ, अमित पंडीत, इंद्रजित थोरात, शरयू देशमुख यांनी अभिनंदन केले आहे.