Breaking News

शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्या पूजा मोरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत

बीड, दि. 30, नोव्हेंबर - गेवराई तालुक्यातील शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्या पूजा मोरे यांनी कोल्हापूर (जयसिंगपूर) येथे खा.राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्या उपस्थितीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेत जाहीर प्रवेश केला. फक्त शेतकरी प्रश्‍नांची बांधिलकी म्हणून संघटनेत त्या काम करणार आहेत. 



शेतक-यांच्या प्रश्‍नांवर लढणारे एक व्यासपीठ म्हणून त्या फक्त संघटनेचे काम करणार आहेत. राजकीयदृष्ट्या त्या शिवसेना पक्षातच सक्रिय असतील असेही त्यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले. 

’मी शिवसेनेची पंचायत समिती सदस्य आहे. मी आजही शिवसेनेत आहे, उद्याही शिवसेनेत असेल. शिवसेना ही माझी राजकीय भूमिका आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटना ही माझी शेतक-यांच्या प्रश्‍नांविषयीची भुमिका आहे. मी स्वाभीमानी संघटनेच्या विचाराला मान्य केलंय. पक्षाच्या नाही. असे त्या म्हणाल्या.