क्रेनच्या धडकेत महिला जागीच ठार, संतप्त जमावाकडून क्रेनची मोडतोड
सांगली, दि. 20, नोव्हेंबर - मिरज औद्योगिक वसाहतीत भरधाव क्रेनची मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात घरी निघालेली एक महिला जागीच ठार झाली. ही घटना रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातानंतर संतप्त जमावाने या क्रेनवर दगडफेक करीत मोठे नुकसान झाले.
कांचन विजय कांबळे असे या महिलेचे नाव आहे. कांचन कांबळे या मिरज औद्योगिक वसाहतीत कामास आहेत. मात्र काही कामानिमित्त त्या घरी जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या क्रेनने त्यांना जोराची धडक दिली. या धडकेने कांचन कांबळे या त्या क्रेनच्या पुढील चाकात सापडल्या व चालकास अंदाज न आल्याने क्रेन त्यांच्या अंगावरून गेल्याने त्या जागीच ठार झाल्या.

अचानक घडलेल्या या घटनेने घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. संतप्त नागरिकांनी क्रेनवर दगडफेक करीत काचा फोडून मोठे नुकसान केले. या घटनेनंतर क्रेनचालक फरार झाला आहे. याबाबत मिरज औद्योगिक वसाहतीचे सचिव गणेश निकम यांनी कुपवाड औद्योगिक वसाहत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.