Breaking News

स्विस बँकेतील काळ्या पैश्याची माहिती मिळण्याची शक्यता


स्विस बँकेतील काळ्या पैशाची माहिती लवकरच मिळण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण कायदा स्वित्झर्लंड सरकारने पारित केला आहे.
स्वित्झर्लंड मधील बँकांमधील भारतीयांच्या खात्यांची माहिती भारताला आपोआप, तात्काळ मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या कराराला स्वित्झर्लंडच्या संसदेच्या अर्थविषयक समितीने मंजुरी दिली आहे. स्वित्झर्लंडच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील ‘कमिशन फॉर इकॉनॉमिक अफेअर्स अँड टॅक्सेस’ या समितीने या कराराला नुकतीच मंजुरी दिली आहे. भारतासह अन्य ४० देशांबाबतचा हा करार करण्यात आला आहे.