Breaking News

पानिपतकरकार यांचा ‘झोपू’ मध्ये घोटाळा

विकासकांना कामामध्ये अतिरिक्त मंजुर्‍या दिल्याचा चौकशी समितीचा आरोप 


मुंबई : माजी सनदी अधिकारी विश्‍वास पाटील यांनी सेवानिवृत्ती आधी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या कार्यालयात विकासकांना कामामध्ये अतिरिक्त मंजुर्‍या दिल्याचा आरोप चौकशी समितीने केला.पाटील यांच्यावर अनेक आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी चौकशी समिती नेमली होती. त्यानुसार पाटील यांच्यावर करण्यात आलेले आरोप योग्य असल्याचे या समितीने स्पष्ट केले. 

त्यामुळे समितीला सखोल चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार समितीने आपल्या अहवालात विश्‍वास पाटील यांनी जूनमध्ये निवृत्तीआधी केलेला घोटाळा स्पष्टपणे मांडण्यात आला आहे. निवृत्तीआधी शेवटच्या महिन्यात पाटलांनी 137 प्रकल्पांना अति वेगवान मंजुर्‍या देऊन 33 प्रकरणांमध्ये नियमबाह्यता केल्याचे आढळून आले आहे. 

यापैकी 8 प्रकल्पांना झोपडपट्टी घोषित होण्याआधीच झोपडपट्टी म्हणून पुनर्विकास करण्याची मंजुरी दिली, त्यातील 5 प्रकल्पात खाजगी जमिनीचा समावेश आहे, तर एका प्रस्तावात बिल्डरने चक्क सहकारी संस्था असलेल्या जमिनीवर एसआरए योजना राबवण्याची परवानगी मागितली होती. पाटील आणि सोबतच्या अधिकार्‍यांनी अटी टाकत या सर्व प्रकल् पांना मंजुरी देऊन टाकली.