संग्रामपूर तालुक्यात गुरुनानक जयंती उत्साहात साजरी
बुलडाणा, दि. 06, नोव्हेंबर - तालुक्यातील निमखेडी(चिचारी) या गावातील गुरुद्वारा गुरुगोविंदसिंग दरबार येथे दिनांक 4 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
संग्रामपूर तालुक्यातील निमखेडी(चिचारी) या गावात गुरुगोविंदसिंग दरबार येथे मोठ्या उत्साहाने गुरुनानक जयंती साजरी करण्यात आली. एकतेचा संदेश देणारे शिखांच्या या पहिल्या गुरुंच्या जयंतीनिमित्त निमखेडी गुरुद्वारामध्ये शिख बांधवांनी माथा टेकवला, गुरुद्वाराला आज फुलांनी सजविण्यात आलं होतं. संपुर्ण मानव जातीला संदेश देणार्या गुरुनानक जयंतीनिमित्त गुरुद्वारामध्ये दर्शन घेण्यासाठी सिख भाविकांची मोठी गर्दी झालेली होती. शिख समाजाचे गुरुनानक देवजी प्रथम प्रथम गुरु मानले जातात. गुरुनानक प्रकाश उत्सव आणि जयंती म्हणून ओळखल्या जात असते. शिख बांधवांचा गुरुनानक जयंतीला विशेष महत्व देण्यात येत असतो. या ठिकाणी लंगर आयोजित करण्यात आले होते. तसेच खंडपाठन, प्रवचन,किर्तन असे धार्मिक कार्यक्रम.. जो बोले सो निहाल सत श्री अकाल जयघोष... अशा उत्साहात निमखेडी गुरुद्वारामध्ये गुरुनानक जयंती साजरी करण्यात आली आहे. या दरम्यान संग्रामपूर येथील दयालसिंह चव्हाण यांचे परिवारासह तालुक्यातील टुनकी व निमखेडी तसेच बाहेरिल गावातील शिख बांधव मोठ्या संख्येने या जयंतीनिमित्त गुरुद्वारामध्ये उपस्थित होते.