Breaking News

तळागाळातील लोकांच्या प्रवेशामुळे वाहतुकसेना बळकट - राठोड.

प्रत्येक राज्यात अनेक संघटना आहेत. त्यामध्ये पक्षाच्या पण वेगवेगळ्या शाखा आहेत पण ज्या पक्षामध्ये आवडीने लोक जोडले जातात त्याच पक्षाचे भविष्य उज्वल असते. तळागाळातील लोकांच्या प्रवेशामुळे भविष्यात वाहतुकसेना बळकट होणार असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले. 


वाहतूक सेनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वाहतूक सेनेच्या उपशहरप्रमुकपदी सचिन भिंगारदिवे,बुरूडगाव विभाग प्रमुकपदी पाडुरंग जाधव,भिंगार उपविभाग प्रमुकपदी सनी पाटोळे,यांची नियुक्ती करून त्यांना पत्र देण्यात आले.

यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक विक्रम राठोड, भगवान फुलसैंदर, संभाजी कदम, वाहतुक संघटनेचे शहरप्रमुख संजय आव्हाड, राजू देठे, रावजी नांगरे, वैभव सुरवसे, सोनू सैंदाने,पप्पू भाले,सागर भिंगारदिवे,बंटी देवकर,शुभाष शिंदे,राजू काळे,राजू जाधव,आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना ते म्हणाले वाहतूकसेने मध्ये सर्व सामान्य गरजू रोज कष्ट करतात. ही सर्वमंडळी आपल्या वाहनाच्या माध्यमातून सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असतात. या सर्वांचे कार्य उल्लेखनीय असे आहे.