ह.भ.प. बाळासाहेब केसरे जयरत्न पुरस्काराने सन्मानित
कर्जत मधील धार्मिक क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ह.भ.प. बाळासाहेब केसरे यांना अहमदनगर येथे जयरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.अहमदनगर येथे युवा कार्यक्रम खेल मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र व जिल्हा समाजकल्याण कार्यालय जि. प. जिल्हा क्रीडा कार्यालय, रयत प्रतिष्ठान, व जय स्वयंसेवी संस्था याच्या संयुक्त विद्यमाने नेहरू युवा केंद्राच्या वर्धापनदिन निमित्त राज्यस्तरीय लोककला महोत्सव २०१७ चे आयोजन करण्यात आले होते.
शिर्डीचे खासदार सदाशिवराव लोखंडे याच्या हस्ते देण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्यास जात प्रमाणपत्र पडताळणी अध्यक्ष गुलाबराव खरात, नेहरू युवा केंद्राचे समन्वयक बाबजी गोडसे, कर्नल बहादूर सिंह, कांतीलाल जाडकर, रयत प्रतिष्ठानचे पोपटराव बनकर, अड भानुदास होले, जय स्वयंसेवी संस्थाचे अध्यक्ष अड महेश शिंदे, आदी सह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कर्जत येथील ह.भ.प. बाळासाहेब केसरे यांनी गेली २५ वर्षापासून विविध वृत्तपत्रे व दिवाळी अंकातून संतावर लेख लिहितानाच विविध धार्मिक सण उत्सव वा धर्मिक काळात लेखन केले आहे याशिवाय सामाजिक लेखाद्वारे समाज प्रबोधनाचे काम केले आहे. ते उत्कृष्ट प्रवचनकार असून विविध सामाजिक कार्यात ते सातत्याने भाग घेत असतात. या अगोदर केसरे याना त्याच्या कार्याबद्दल समाज भूषण, कर्जत भूषण, युवा भूषण व राज्यस्तरिय जीवन गौरव पुरस्कार मिळालेले आहेत