देशाच्या विकासाचे धोरण ठरवताना शेवटच्या माणसाचा विचार आधी व्हावा - तुषार गांधी
लातूर, दि. 07, नोव्हेंबर - आज सत्तेला प्रश्न विचारणार्याला देशद्रोही ठरवले जात आहे,जात ,धर्म, वंश, प्रांत, भाषा यावरुन समाजामध्ये विघटन केले जात आहे हे पूर्णतः चुकीचे आहे. कायद्यांचा लाभ समाजातल्या सर्व घटकांना मिळायला हवा,कायदा सर्वांसाठी एकच आहे, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही,त्याचा तसा अंमल व्हावा तरच त्याची प्रभावी प रिणामकारकता दिसून येते. संस्कृती प्राचीन असून चालत नाही तर ती समकाळात प्रस्तुत असायला पाहिजे असे असे सांगून, देशाचे धोरण ठरविताना शेवटच्या माणसाचा विचार अगोदर व्हावा अशी गांधींची अपेक्षा होती. विकासाच्या नावाने आज लोकांना मूर्ख बनविण्याचे कारस्थान चालू आहे. मुठभरांचा विकास म्हणजे विकास नव्हे, असे प्रतिपादन गांधी विचारांचे अभ्यासक, त्यांचे पणतू तुषार गांधी यांनी केले.सन 2016 मध्ये लातूर येथे विद्यार्थ्यांच्या सहाय्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे दयानंद सभागृहात उद्घाटन करताना 21 व्या शतकाची आव्हाने आणि गांधी विचार या विषयावर ते बोलत होते.विचारांची हत्या करणे हा आतंकवादच असून, अशा प्रवृत्तीतूनच महाराष्ट्र-क र्नाटकाने चार विचारवंतांना गमावले असल्याची खंत तुषार गांधी यांनी व्यक्त केली. डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, कर्नाटकातील डॉ. एमएम कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश या पुरोगामी विचारवंतांच्या हत्त्यांकडे त्यांचा रोख होता. हिंदू आतंकवादावरही त्यांनी यावेळी परखड भाष्य केले. आज केवळ हाडामासांचा सापळा बनलेल्या समाजात महात्मा गांधी कितपत प्रासंगिक आहेत हे सांगताना तुषार गांधी म्हणाले, आज चौका-चौकात देशभक्ती शिकवली जात असली, तरी आपला समाज सर्वाधिक विघटीत समाज आहे, या समाजात जाती-पातींचे प्राबल्य आहे. विविध प्रादेशिक, आर्थिक आणि धार्मिक विचारांच्या दर्या फाकलेल्या आहेत. देशाच्या समग्र व्यक्तीमत्वाचीच अशी वाटणी झाली आहे. फक्त चिनी आणि पाकच्या आक्रमणाच्या वेळेसच आम्हाला देशभक्ती आठवते. आज-काल सरदार पटेल यांची स्तुती करण्याची फॅशन आली आहे आणि बापू मात्र भिंतींची शोभा आणि छातीवरचा बिल्ला होवून बसले आहेत. भिंतीवर टांगलेल्या बापूंची तसबीर हेच या देशाचे दुर्भाग्य आहे, आम्ही गांधी मार्गाचा शोधच घेण्याचे विसरुन चाललो आहोत.गांधी मार्गाचा शोध आपल्या अंतरात्म्यातून घेतला गेला पाहिजे. बापूंनी आपल्यामधील कमजोरी ओळखली आणि त्यावर मात केली. तेव्हा बापू समजण्यासाठी त्यांना तसबीरीतून काढून त्यांचा आरसा बनविल्याशिवाय आपण तो मार्गच शोधू शकत नाही. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार यांनी व्याख्यानाच्या आयोजनामागील भूमिका सांगून विद्यार्थी सहाय्यक मंडळाची संक ल्पना स्पष्ट केली. अतुल देऊळगावकर यांनी तुषार गांधींचा,तर डॉ.भातांब्रे यांनी डॉ.काब्दे यांचा परिचय करुन दिला.
