कर्जमुक्तीसाठी राज्यात 7 डिसेंबरपासून किसान मंच करणार जेलभरो आंदोलन
औरंगाबाद, दि. 07, नोव्हेंबर - शेतकरी कर्जमुक्तीसह हमीभाव व इतर मागण्यांबाबत सरकारकडे आंदोलने, विरोधी पक्षाकडून विधीमंडळातील आग्रह, न्यायालयातील लढा अशा वेगवेगळ्या स्तरावरून प्रयत्न होऊनही शेतक-यांच्या पदरी निराशाच पडली आहे. यामुळे 7 डिसेंबरपासून राज्यभरात जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय किसान मंचच्या राज्यस्तरीय कार्यकारी समितीने घेतला, अशी माहिती निमंत्रक शंकरअण्णा धोंडगे यांनी दिली.
किसान मंचतर्फे वेगवेगळ्या संघटनांच्या राज्यकार्यकारिणी सदस्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकार निष्ठूर असल्याची भावना अनेकांनी बैठकीत व्यक्त केली. दुष्काळ, रोगराई, अतिवृष्टी व शेती उत्पादन भाव याबाबत यापूर्वी उपाययोजना होत होत्या, मात्र सध्याच्या सत्ताधा-यांनी मदत दिलीच नाही, उलट जबाबदार मंत्र्यांनीही शेतकरी आत्महत्यांसारख्या संवेदनशील बाबींवर उपहास केला, अशा भावना व्यक्त झाल्या.