Breaking News

राष्ट्रीय पेयजल योजनेत लाखोंचा गैरव्यवहार

अहमदनगर, दि. 06, नोव्हेंबर - तालुक्यातील पिंपरखेड येथील राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम पूर्ण न करताच लाखो रूपयांचा निधी केला हडप करण्यात आला. या योजनेचे काम दोनवर्षा अर्धवटरित्या बंद पडले आहे. टाकीचे बांधकाम अंदाजपत्रकाप्रमाणे झाले नाही. कदम वस्तीवरील ग्रामस्थांनी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना यासंदर्भात निवेदन देऊन या गैरव्यवहाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.
पिंपरखेड येथे सन 2014 - 15 ला  राष्ट्रीय पेयजल योजनेचे  काम करण्यात आले. परंतु या योजनेच्या अंदाजपत्रकात  गावातील प्रत्येक वस्तीवर, गावांत 32 किलोमीटरचे नवीन पाईप लाईनचे काम करणे बंधनकारक होते. मात्र ठेकेदाराने दोन वर्षात फक्त 13 किलो मीटरची पाईप लाईन केली. त्यामुळे या योजनेपासून कदम वस्तीसह गावठान व अनेक वस्त्या या महत्वाकांक्षी योजनेपासून वंचित राहिल्या आहेत. या कामाची ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वेळोवेळी चौकशीही केली. मात्र संबंधित अधिकारी केवळ उडवाउडवीची उत्तरे देत होते. या योजनेसाठी कदमवस्तीवरील ग्रामस्थांनी दि. 5 आँक्टोबरला उपोषणही केले. त्यावेळी उपअभियंता एस. जी. गायकवाड  यांनी उपोषणकर्तांना लेखी दिले. राष्ट्रीय पेयजल योजनेतून गांव पूर्ण हागणदारीमुक्त झाल्यानंतर पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यात येईल, असे गायकवाड यांनी लेखी स्पष्टीकरण दिले होते. ‘चोरांच्या उलट्या बोंबा ’ या उक्तीप्रमाणे गायकवाड यांच्या या ग्रामस्थ या लेखी उत्तरावर गप्प न बसता  वरिष्ठ कार्यालयात जाऊन या योजेची चौकशी केली असता. धक्कादायक माहीती समोर आली. ती अशी या योजनेतुन 32 किलो मीटर पाईप लाईनचे काम  पुर्ण झाले आहे .त्याचे तिसर्‍या हाप्त्याचे बील  दिनांक 30 /9  / 2015 ला  92 लाख रूपये  ठेकेदाराला देण्यात आले.  व खात्यावर दहा टक्के 9 लाख रूपये शिल्लक ठेवण्यात आले आहेत.   तर उपोषणात लेखी दिले म्हणजे ग्रामस्थांनची दिशाभुल करण्यासाठी  या योजेनेतुन नविन टाकीपासुन गावापर्यंत पाईप लाईन झाली नाही ,गावात व अनेक वस्त्यावर पाईप लाईन झाली नसताना  हे काम पुर्ण झाले असे बनावट दस्ताऐवज तयार करून ठेकेदार, संबधीत आधिकारी, सरपंच यानी नीधी हाडप केला आहे या योजनेची चौकशी करून सबंधितावर कारवाई करण्यात यावी.
यासाठी  निवेदनावर   मोहीदीन शेख, प्रदिपकुमार ढवळे, संजय कदम, कुंडल कदम, नवनाथ कदम, नितीन कदम, मारूती भिवरकर, दत्तात्र्ये कदम, पाठक ज्ञानेश्‍वर  यांच्या सह मान्यवराच्या सह्या आहेत.