Breaking News

घरकुल प्रकरणांची चौकशी न केल्यास उपोषणाचा इशारा

अहमदनगर, दि. 2, नोव्हेंबर - तालुक्यातील दाढ खुर्द ग्रामपंचायतीने प्रधानमंत्री आवास योजनेतील सन 2016 -17 च्या ब यादीमधील 273 लाभार्थ्यांच्या यादीमधून 154  लाभार्थ्यांना अपात्र केल्याप्रकरणी संबंधितांची चौकशी करुन कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले असून सदर प्रकरणांची चौकशी न झाल्यास शुक्रवार  दिनांक 10 नोव्हेंबर 2017 पासून  पंचायत समिती संगमनेर येथे आमरण उपोषणाचा इशारा जि. प. माजी सभापती गणपतराव सांगळे, नारायण काका कहार, विजय हिंगे, सुरेश  जोरी   यांनी दिला आहे.
निवेदनात पुढे म्हटले सन 2016 -17 च्या ब यादीमधील 273 लाभार्थ्यांच्या यादीची ऑक्टोबर 2016 मध्ये तपासणी केली. तपासणी केलेली यादीमध्ये एक वर्षांनंतर 154  लाभार्थ्यांना कुठलीही कल्पना न देता राजकीय व्देष धरुन अपात्र केले.  जे गरीब व गरजु लाभार्थी आहेत त्यांना ब यादीत समावेश करुन घरकुलांचा लाभ द्यावा  अशा विनंतीचे  निवेदन देण्यात आले. ट
सदर प्रकरणांची चौकशी न झाल्यास शुक्रवार दिनांक 10 नोव्हेंबर 2017 पासून  पंचायत समिती संगमनेर येथे आमरण उपोषणाचा इशारा जि.प.माजी सभापती गणपतराव सांगळे,  नारायण काका कहार  विजय हिंगे, सुरेश जोरी  व ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
या मागण्यांचे निवेदन आज तहसिलदार साहेबराव सोनवणे यांना दिले यावेळी नारायण काका कहार, सुरेश जोरी, विजय जोशी, शंकर जोशी, नानाभाऊ जोशी, साहेबराव जोशी,  विठ्ठल वाघ, आण्णा दातीर, अनिल कहार, बाबुराव जोशी, सुरेश मेहर, ज्ञानेश्‍वर जोरी, गणेश जोरी आदी उपस्थित होते.