न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर
अहमदनगर, दि. 2, नोव्हेंबर - अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर या महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नॅक बंगलोर या स्वायत्त संस्थेने अ++ ही श्रेणी प्रदान केली असून मूल्यांकनाच्या तिसर्या टप्प्यावर महाविद्यालयाने 4 पैकी 3.79 गुण मिळवून देशात चौथे व महाराष्ट ्रात पहिले स्थान मिळवले.
दर 5 वर्षानंतर महाविद्यालयांना नॅक चे मूल्यांकन करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानुसार 4 ते 6 सप्टेंबर दरम्यान मूल्यांकनाची तिसरी फेरी कॉलेजमध्ये पार पडली होती.
हिमाचल प्रदेशचे केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. कुलदीपचंद अग्निहोत्री यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय महाविद्यालय समस्तीपूर (बिहार) चे प्राचार्य डॉ.सरदार अरविंद सिंग व विश्वभारती विद्यापीठ, शांती निकेतनचे प्राध्यापक डॉ. सभ्यसाची सारखेल या सदस्यांच्या समितीने हे परीक्षण केले.