काळ्या फिती लावून शिक्षकांचे अध्यापन
अहमदनगर, दि. 2, नोव्हेंबर - शिक्षकांची काढून घेण्यात आलेली हक्काची कुटुंब निवृत्ती योजना, ऑनलाईन व शालेय पोषण आहाराची किचकट नोंदणी पध्दत, शिक्षकांवर टाकण्यात आलेला अशैक्षणिक कामांचा बोजा तसेच दर आठवड्याला निघणारे नव-नवीन शासन निर्णयामुळे शिक्षक वैतागले असतानाच 23 ऑक्टोबर रोजी निर्गमित केलेल्या शिक्षकांच्या व रिष्ठ व निवड श्रेणीचा शासन निर्णय यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण होते.याचा निषेध करण्यासाठी दिवाळीच्या सुट्टीनंतर पहिल्या दिवशी काळ्या फिती लावून अध्यापनाचे क ार्य करावे असे आव्हाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आले होते.या आवाहनाला प्रतिसाद देत काळ्याफिती लावून शिक्षकांनी अध्यपनाचे कार्य केले.
शहरातील सेक्रेटहार्ट कॉन्व्हेंट, पंडित नेहरु हिंदी विद्यालय आदिंसह जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये काळ्या फिती लावून अध्यापनाचे कार्य करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, नाशिक विभाग प्रमुख सुनिल पंडीत, सुहास धिवर, वैभव शिंदे, सुदेश छजलाने, विनित थोरात, विशाल महल्ले, कमल भोसले, मोनिका मेहतानी, शिल्पा पाटोळे, उज्वला आदिक, उषा शौरान, अंजली मिश्रा, ठाकुरदास परदेशी, योगेश गायकवाड आदि उपस्थित होते.
समान काम समान वेतन या संवैधानिक हक्काची पायमल्ली करत दि.1 नोव्हेंबर 2005 रोजी शिक्षकांच्या हक्काची कुटुंब निवृत्ती योजना काढून नवीन अंशदायी पेन्शन योजना लागू करुन, शिक्षकांच्या तोंडातून घास काढून घेण्यात आला असून, शिक्षकांच्या जीवनातील हा काळा दिवस आहे. वरिष्ठ व निवड श्रेणी मिळण्याकरीता शिक्षण विभागाने प्रशिक्षणाचे स्वरुप बदलून त्यामध्ये जाचक अटीचा समावेश केला आहे. या जाचक अटीमुळे बहुसंख्य शिक्षक वरिष्ठ व निवड श्रेणी मिळण्यापासून वंचित राहणार असून, हा शासननिर्णय शिक्षकांवर अन्यायकारक पध्दतीने लादण्यात येत असल्याची भावना जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे यांनी व्यक्त केली.