Breaking News

सरकारच्या विरोधात शेतकर्‍यांचा पुन्हा अक्रोश

अहमदनगर, दि. 07, नोव्हेंबर - राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी व शेतकर्‍यांच्या मागण्यासाठी दि.2 नोव्हेंबर पासून राज्यातील शेतकर्‍यांनी कानगाव  (ता.दौंड) येथून अक्रोश राज्यव्यापी असहकार संप सुरु करण्यात आला आहे. राज्यभरातून त्यास पाठिंबा मिळत  असुन यामध्ये राज्यभर समिती दौरे करणार असून लवकरच शेतक र्‍यांच्या हितासाठी औरंगाबाद येथे 19 नोव्हेंबरला आक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समन्वयक समितीचे शांताराम कुंजीर आणि अखिल भारतीय मराठा  शेतकरी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राज्य सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका दहातोंडे यांनी यावेळी केली.
यावेळी शांतारा कुंजीर, संपत फडके , संतोष नानवटे, अ‍ॅड.कमल सावंत, अनिल तागडे  पाटील, विजय काकडे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना कुंजीर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली कर्जमाफी अपुरी असून ही कर्जमाफी आता कागदपत्रात अडकल्यामुळे बँकांचे अधिकारी सहकार  खात्याचे अधिकारी संभ्रमावस्थेत आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांना अजून या योजनेचा लाभ मिळालेला नाही. शेतकरी वर्गात अस्वस्थता आहे. आधारकार्ड ऑनलाईन प्रक्रिया तसेच वि विध नियम यामुळे बहुसंख्य शेतकरी कर्जमाफी योजनेपासुन वंचित राहिले आहेत. राज्यसरकारच्या अन्यायाकारक धोरणाचा निषेध करण्यासाठी दि.2 नोव्हेंबरपासून कानगांव येथून  शेतकरी अक्रोश राज्यव्यापी असहकार संप सुरु करण्यात आला आहे. हे आंदोलन राज्यभर पसरण्यासाठी शेतकरी अक्रोश कृती समितीच्यावतीने जिल्हा निहाय बैठका व मेळावे  घेण्यात येत आहेत.
 शेती व पुरक व्यवसायांची कर्जमुक्ती करावी, शेती उत्पादनाला खर्चावर अधारीत भाव मिळावा, शेतकरी पती पत्नीला प्रतिमहा पाच हजार निवृत्ती वेतन देण्यात यावे, प्रगत देशामध्ये  1920 पासून लागू असलेला  इर्मा कायदा शेकर्‍यांच्या हितासाठी लागू करावा अशी माणी केली आहे.