Breaking News

सावेडी बसस्थानक त्वरित सुरु करा - राष्ट्रवादीची मागणी

अहमदनगर, दि. 07, नोव्हेंबर - गेल्या अनेक वर्षापासून सावेडी बसस्थान बंद असून ते सुरु करण्याची मागणी एसटी मंडळचे विभागीय नियंत्रक यांच्याकडे निवेदनाव्दारे राष्ट्रवादीच्या  वतीने करण्यात आली आहे. यावेळी दिेलेल्या निवेदनावर आमदार संग्राम जगताप, कुमार वाकळे, सुरेश बनसोडे, निलेश बांगरे, संभाजी पवार, सारंग पंधडे, दिलदसिंग बिर, साहेबान  जहागिरदार आदिसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
निवेदनात म्हंटले आहे की, सावेडी बसस्थान सुुर झाल्यास हे नागरिकांच्या सोयीचे व महामंडळाच्या आर्थिक फायद्याचे होईल. यामुळे प्रवाश्यांचा प्रवास सुरकर होईल. सदरची माहिती  आपल्या कार्यालयालाही आहे मात्र याकडे कानाडोळा केला जात असल्याचे नागरीकांचे म्हणने आहे. तरी लवकरात लवकर या बसस्थानक सुरु करण्यासाठी प्रयत्न व्हावेत हीच  अपेक्षा आहे. हे बसस्थानक त्वरीत सुरु न केल्यास आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा इशाराही देण्यात  आला आहे.