Breaking News

ग्रामीण रुग्णालय हलविले नगरपालिकेच्या अभ्यासिकेत


राहुरी प्रतिनिधी - येथील ग्रामीण रुग्णालयाची इमारत जुनी व अतिशय जीर्ण झाली आहे. त्या इमारतीत रुग्णांना आरोग्य सुविधा देण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्या आदेशाने ग्रामीण रुग्णालय बाजारतळावरील नगरपालिकेच्या अभ्यासिकेमध्ये सुरु करण्यात आले आहे. नुकतेच या रुग्णालयाची माजी नगराध्यक्षा डॉ उषाताई तनपुरे यांनी पाहणी केली. या रुग्णालयाचे नुकतेच मोठ्या थाटात उदघाटन करण्यात आले.
येथील ग्रामीण रुग्णालय नगरपालिकेच्या पाठीमागील धान्य बाजार येथे हलविण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी, विरोधी पक्ष नेते शिवाजी सोनवणे, मुख्याधिकारी नानासाहेब महानवर, वैद्यकीय अधिकारी डॉ. डोईफोडे, डॉ. सुधीर क्षीरसागर आदी उपस्थित होते. डॉ. तनपुरे म्हणाल्या, की नगरपालिकेचे दवाखाने शासनाने बंद केल्याने हा दवाखाना नगरपालिकेने शासनाकड़े वर्ग केला. त्यामुळे हा दवाखाना आहे त्याच जागेत वर्ग केला. पण ग्रामीण रुग्णालयाची इमारत अतिशय जूनी व जीर्ण झाल्याने तालुक्यातील तसेच शहरातील नागरिकांना उपचार घेताना तसेच येथील रुग्ण, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरून बसावे लागत होते. यासाठी शासनाने रुग्णालयाची नवीन इमारत बांधून द्यावी.

राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयाचे प्रश्न विधान सभेत माजी अर्थमंत्री जयंत पाटील ह्यांनी लक्षवेधी सूचना मांडून उपस्थित केली असता त्यावेळी आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालयाच्या इमारतीचा प्रश्न सहा महिन्यात मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन सभागृहात दिले होते. त्याप्रमाणे राहुरीच्या इमारतीसाठी १७ कोटी रूपये खर्चास प्रशासकीय मान्यता दिली. त्यासाठी ३ कोटी ५० लाख रूपये वर्ग केले. ग्रामीण रुग्णालयाच्या या प्रश्नाबाबत माजी खा. प्रसाद तनपुरे यांनी पाठपुरावा केला. यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी, विरोधी पक्षनेते शिवाजी सोनवणे, संजय कुलकर्णी यांची भाषणे झाली.

यावेळी नगरसेवक सूर्यकांत भुजाडी, अनिल कासार, दशरथ पोपळघट, नंदकुमार तनपुरे, विजय करपे, ज्योती तनपुरे, संगीता आहेर, श्रीमती मुक्ता करपे, सोनाली बर्डे, सुनील फड़के, शाखा अभियंता मोटे, डॉ. प्रीतम चुत्तर, डॉ. सचीन पोखरकर आदींसह नागरिक उपस्थित होते.