Breaking News

पद्मावती चित्रपटावर महाराष्ट्रामध्ये प्रदर्शनास बंदी घालण्याची मागणी.


नेवासा /शहर प्रतिनिधी /- राजपूत समाजाचा तेजस्वी इतिहास जाणीवपूर्वक कलंकित करणाऱ्या संजय लीला भंसाली यांच्यावर गुन्हा दाखल करून पद्मावती या चित्रपटास महाराष्ट्रामध्ये प्रदर्शनास बंदी घालावी.अश्या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले . 

असे निवेदन नायब तहसील दार ज्योतीप्रकाश जायकर यांना तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटना,महाराणा प्रताप युवा प्रतिष्ठान व करणी सेना यांच्या वतीने देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की , संजय लीला भन्साली दिग्दर्शित महाराणी पद्मावती हा चित्रपट हिंदू समाजाच्या व रजपूत समाजाच्या भावना दुखावणाऱ्या असुन आपल्या मातृसत्ताक देशामध्ये एका स्त्री चा ज्वलंत इतिहास जाणीवपूर्वक कलंकित करण्यात आला आहे .हा चित्रपट रजपूत समाजाच्या तज्ञ इतिहासकारांना दाखविण्यात यावा व त्यामधे राजपूत समाजाच्या भावना दुखावल्या नसतील व आक्षेपार्ह चित्रीकरण नसेल याची खात्री झाल्यानंतर समाजाची परवानगी घेऊनच पुढील पाउल उचलावे. 


 या सर्व बाबींचा विचार न करता प्रशासनाने हा चित्रपट प्रदर्शित करण्यास परवानगी दिल्यास होणाऱ्या परिणामांना प्रशासन जबाबदार राहिल .निवेदनात पुढे म्हटले आहे की महाराणी पद्मावती यांनी आपल्या शिलत्वाचे रक्षण करण्यासाठी १६ हजार स्त्रियांना घेऊन जोहर केला हा इतिहास संपूर्ण जगात प्रचलित आहे.राजपूत समाजाचा तेजस्वी इतिहास जाणीवपूर्वक कलंकित करणाऱ्या संजय लीला भंसाली यांच्यावर गुन्हा दाखल करून पद्मावती या चित्रपटास महाराष्ट्रामध्ये प्रदर्शनास बंदी आणावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल व जिल्ह्य़ामध्ये प्रदर्शित होवू देणार नाही .