अज्ञात चोराने मारला डल्ला ,दीड लाखाचा माल लंपास .
याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की,शहादेव दहिफळे हे मूळचे दैत्यनांदूर असुन ते सेवानिवृत्त माजी सैनिक आहेत.हल्ली ते भिंगार येथे राहतात २३ नोव्हेंबर रोजी त्यांच्या पुतणीच्या लग्नासाठी आले होते.२५ नोव्हेंबर रोजी लग्न समारंभ संपल्यावर रात्री जेवण करून साडे अकराच्या नंतर सर्व जण झोपले.शहादेव दहिफळे हे घरासमोरील पत्र्याचा पडवीत झोपले होते.
मध्यरात्री पावणे एक वाजता त्यांचा गळ्यातील चैन कोणीतरी काढीत असल्याचे जाणवल.ते जागे झाले तेंव्हा त्यांचा जवळून एक अनोळखी इसम पळाला.त्यांवेळी गळयातील चैन पाहिली असता ती तुटलेली दिसली.त्यानंतर पॅन्ट मधील मोबाईल व रोख रक्कम पॅन्ट मध्ये मिळून आली नाही. शहादेव दहिफळे यांच्या फिर्यादिवरून पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
