Breaking News

टॅक्स ऑडीटची मुदत दोन महिन्याची मुदतवाढ करून देण्यात यावी

बुलडाणा, दि. 01, नोव्हेंबर - आयकर कायद्यानुसार टॅक्स ऑडीटची मुदत 31 ऑक्टोबर पयर्ंत वाढवून दिलेली होती. त्यामध्ये अजून दोन महिन्याची मुदतवाढ करून देण्यात यावी व व्यापारी करदात्यांना, लेखापाल- व्यावसायीक यांना दिलासा द्यावा, अशी मागणी मलकापूर व्यापारी संघटना, इंडस्ट्रीज असोसिएशन यांनी आ.चैनसुख संचेती, राज्यसभा सदस्य व खा.अजयभाऊ संचेती यांचेकडे एका निवेदनाव्दारे केली आहे. 
जीएसटीच्या कठोर नियमांमुळे लेखापाल त्रस्त तर व्यापारी चिंताग्रस्त झाले असून या परिस्थितीत इन्कमटॅक्स ऑडीटची तारीख आणखी वाढवून देणे गरजेचे असून त्यासंदर्भात व्यापारी संघटना, इंडस्ट्रीज असो. यांनी आ.चैनसुख संचेती व खा.अजयभाऊ संचेती यांचेमार्फत शासनाला साकडे घातले आहे. व्यावसायीक लेखापालांवरच बहुतांश व्यापारी अवलंबून असतात. अशावेळी व्यावसायीक लेखापाल वहीखाते लिहण्याची कामे वेळेत करणार नाही तर व्यापारी वगार्चे काम कसे चालेल? अशी चिंता व्यापारी वगार्ला सतावू लागली आहे.तर जीएसटीमुळे कामाचा व्याप अतोनात वाढल्याने लेखापाल व्यावसायीक यांना वेळच मिळत नसून वेळेच्या आत जीएसटीचे विवरण पत्रके दाखल केली नाहीतर विलंब शुल्काची टांगती तलवार व्यापारी करदात्यांच्या डोक्यावर राहते. अशी गुंतागुंतीची परिस्थिती जीएसटीमुळे लेखापाल व व्यापाठयांसमोर निर्माण झाली असून या समस्येला सामोरे जाण्याकरीता आणखी दोन महिने मुदत वाढ करून देत व्यापारी व करदाते तसेच लेखापाल व व्यावसायीक यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.