Breaking News

बुलडाण्यातील फुटबॉलपटू भावांची महाराष्ट्र संघात निवड

बुलडाणा, दि. 01, नोव्हेंबर - जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेले शेख फिरोज शेख चांद यांच्या मोठ्या मुलाचा 17 वर्ष वयोगटातील तर लहान मुलाचा 14 वर्ष वयोगटातील महाराष्ट्राच्या फुटबॉल संघात निवड झाली. 
उस्मानाबाद येथे 28 ऑक्टोंबरला संपन्न झालेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये बुलडाणा जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेले शेख फिरोज शेख चांद यांचा मुलगा शेख मोहम्मद शेख फिरोज याचा 17 वर्षा खालील महाराष्ट्र संघात निवड झाली तर लहान मुलगा शेख मुस्तुफा शेख फिरोज याचा 14 वर्षाखालील महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. पुढील स्पर्धा जम्मु कश्मीर व मणीपुर येथे होणार आहे. अशा प्रकारच्या स्पर्धेकरीता बुलडाणा जिल्हाच नव्हे तर संपुर्ण विदर्भातून पहिलीच वेळ आहे की, एकाच वर्षी दोन्ही भावाची तसेच मास्टर अँथलॅटिक्समध्ये मागील वर्षी हैद्राबाद येथे झालेल्या नॅशनल स्पर्धेत सिल्व्हर मेडल प्राप्त केलेले आहे. या तिन्ही बापलेकांनी महाराष्ट्र संघाचे खेळाकरीता नेतृत्व करुन महाराष्ट्राची शान वाढविली आहे. दोन्ही मुलांना बुलडाणा येथील विविध फुटबॉल क्लब व खेळाडूंचे मार्गदर्शन, प्रोत्साहन व अभिनंदन मिळत आहे. या दोन्ही मुलांची पुणे येथील क्रिडा प्रबोधनीमध्ये निवड झालेली असुन ते तेथील इंटरनॅशनल कोच धिरज मिर्शा यांचे मार्गदर्शनात पुढील स्पर्धे करीता तयारी करीत आहेत. शेख मोहम्मद व शेख मुस्तुफा या दोघांना जिल्हा पोलिस अधिक्षक शशिकुमार मिना व पोलिस निरीक्षक सातपुते यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत असुन जिल्हा पोलिस पतसंस्था यांच्यावतीने या दोघांना प्रत्येकी 7 हजार रुपये बक्षीस देण्यात आले आहे. या दोघांचे खेळाबद्दल झालेल्या निवडीमुळे संपुर्ण बुलडाणा जिल्ह्यातुन त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.