शेततळ्यात पडून शेतक-याचा मृत्यू
हिंगोली, दि. 07, नोव्हेंबर - फवारणी करताना मिनी ट्रॅक्टर शेततळ्यात पडून एका शेतमजूराचा मृत्यू झाल्याची घटना हिरडी या गावात घडली. शेतात फरवारणी करण्याचे काम ट ्र्रॅक्टरचा वापर करून चालले होते. त्यावेळी ट्र्रॅक्टर शेततळत्यात पडले. या अपघातात ट्र्रॅक्टर चालक गजानन चोरघडे यांचा मृत्यू झाला. या घटनेने हिरडी गावात शोककळा पसरली.
