Breaking News

वनवासी कल्याण आश्रमाच्या नगर शाखेतर्फे दोन दिवसीय नगरी कार्यकर्ता शिबिरसंपन्न

जगात २०० देशात ४४ करोड वनवासी असून भारतात १२ करोड संख्या असलेल्या वनवासी बांधवांच्या ७०० हून अधिक जनजाती आहेत. भारताच्या ८ देशांशी सलंग्न सीमावर्ती भागात आरण्य संहिता संस्कृती जोपासत ३३ % भूभागावर वसलेल्या वनवासींचे जीवन ,देशाच्या स्वातंत्र्यानंतर बदलण्याच्या दृष्टीने नगरीय कार्य सातत्याने सुरु असून त्यांना जागृत करून ‘तु मै एक रक्त’ या भावनेतून अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन श्री.भगवानजी सहाय यांनी केले.

वनवासी कल्याण आश्रमाच्या नगर शाखेतर्फे सावेडीतील मोरया मंगल कार्यालय येथे आयोजित दोन दिवसीय नगरी कार्यकर्ता शिबिराचे उद्घाटन अखिल भारतीय नगरीय कार्यप्रमुख व पश्चिम क्षेत्र सहसंघटन मंत्री श्री.भगवानजी सहाय्य यांच्या हस्ते झाले.यावेळी जिल्हा कार्यवाह श्रीकांत जोशी, वनवासी कल्याण जिल्हाध्यक्ष मेघशाम बत्तीन, क्षेत्र नगरिय कार्यसहप्रमुख दिनकर देशपांडे व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सहाय म्हणाले कि, वनवासी बांधवांच्या समस्यांची जाण असणारा कार्यकर्ता असावा. त्याने त्यांच्या समवेत राहून कार्य केले तर अतिउत्तमच. सामुहिक निर्णय पद्धतीचा वापर केला तर कार्याला अधिक गती मिळते. त्यासाठीच वनवासी कल्याण आश्रम या पद्धतीने कार्य करते व त्याचे परिणामही चांगले मिळतात.
या दोन दिवसीय कार्यशाळेत प्रांतातून उपस्थित कार्यकर्त्यांना विविध सत्रात मार्गदर्शन करण्यात आले. वनवासी,आदिवासी व नगरिय कार्यकर्ता यांच्यात समन्वय साधून शहरी भागातील लोकांमध्ये जनजागृती करून त्यांचे सहकार्य व सहभाग कसा वाढेल यावर विचार विनिमय करण्यात आला.
कार्यशाळेस प्रांतनगरिय कार्यप्रमुख श्री.नितीन महाजन, प्रांत संघटन मंत्री जयराम चौधरी,क्षेत्रिय नगरिय कार्यप्रमुख वसंतराव जोशी, प्रांतप्रचार प्रमुख श्रीकांत आपटे,नगर जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब खांदट , वनवासी कल्याण नगर अध्यक्ष प्रमोद मोहोळे,वनवासी कल्याण आश्रमचे महाराष्ट्रातून आलेले व नगर मधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.