Breaking News

औरंगाबादच्या शरदचंद्र पवार कॉलेजात कॉप्यांचा सुळसुळाट,विद्यार्थ्यांकडून मोबाईल जप्त.

औरंगाबाद - बीड रस्त्यावरील शरदचंद्र पवार कॉलेज मध्ये पॉलिटेक्निकच्या तिसऱ्या आणि फार्मसीच्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा सुरु असताना भरारी पथकानं केलेल्या कारवाईत कॉपीबहाद्दर विद्यार्थी पकडण्यात आलं असून काही विद्यार्थ्यांकडून मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत.  


औरंगाबादच्या ग्रामीण पोलिसांनी कारवाईत औरंगाबाद मधील शरदचंद्र पवार पॉलिटेक्निकमध्ये कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला.कॉपी पुरवताना पालकही उपस्थित होते. या परीक्षेसाठी व्हॉट्सअॅपचाही वापर केला जात होता. व्हॉट्सअॅपवरुन विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेर पेपर पाठवत होते. त्यानंतर चिठ्ठीत उत्तर लिहून आतमध्ये पाठवलं जायचं.