भाजपचा बुधवारी काळा पैसाविरोधी दिन
सांगली, दि. 06, नोव्हेंबर - काँग्रेसच्या जनआक्रोश आंदोलनाला त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी बुधवार 8 नोव्हेंबर रोजी काळा पैसा विरोधी दिन साजरा करण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाच्या सांगली शहर व ग्रामीण जिल्हा पदाधिका-यांच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत काँग्रेसच्या जनआक्रोश आंदोलनाबाबत भाजप पदाधिकार्यांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.
सांगली शहरातील लोकमान्य टिळक स्मारक मंदिरात ही बैठक पार पडली. या बैठकीस प्रदेश संघटन मंत्री रवी अनासपुरे, खासदार संजय पाटील, सांगली शहर जिल्हा अध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ आदी उपस्थित होते.
नोटाबंदीच्या निर्णयाची वर्षपूर्ती विरोधी काँग्रेस नकारात्मक पध्दतीने साजरी करणार असेल, तर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही ही वर्षपूर्ती सकारात्मक पध्दतीने साजरी केली पाहिजे. त्यादिवशी आपण सर्वांनीच काळा पैसा विरोधी दिन साजरा करावा, अशी सूचना रवी अनासपुरे यांनी मांडली.
नांदेड महापालिकेची सत्ता शाबूत ठेवल्यानंतर काँग्रेस नेत्यांना दहा हत्तीचे बळ अंगात संचारल्यासारखे झाले आहे, असा टोला लगावत संजय पाटील म्हणाले, की विरोधी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे. त्यावर आता गप्प बसून चालणार नाही. या सर्वांना जशास तसे उत्तर दिले पाहिजे. भविष्यात भाजपमधील नेत्यांनीही आपला शत्रू कोण आहे, हे ओळखून त्याच्याविरोधात लढले पाहिजे. मात्र आपल्यातीलच काहीजण सोयीचे राजकारण करतात, हे चुकीचे आहे, असे मत मांडले.
मकरंद देशपांडे म्हणाले, की नोटाबंदी निर्णयामुळे ज्यांच्याकडे काळा पैसा होता, त्यांची मोठी अडचण झाली. अशा व्यक्तींचा भाजपविरोधी राग असणे स्वाभाविक आहे. मात्र काँग्रेस जनआक्रोश आंदोलनाच्या नावाखाली 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदी निर्णयाचे वर्षश्राध्द घालून सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करीत आहे. त्यातून जनआक्रोशपेक्षा स्वआक्रोशच अधिक दिसत आहे. काँग्रेस नेत्यांचा हा स्वआक्रोश जनतेसमोर आणण्यासाठी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही त्याचदिवशी काळा पैसा विरोधी दिन साजरा करून जशास तसे उत्तर देण्याची गरज व्यक्त केली.