ढोरजकर फौंडेशनच्या वतीने बालभारत कलामहोत्सव साजरा
"मुले ही राष्ट्राची संपत्ती आहेत.मुलांमधील भारतीय घडविण्यासाठी प्रत्येक मोठ्या माणसाचे योगदान आवश्यक आहे. केवळ टीव्ही मोबाईलपासून दूर ठेवणे नव्हे तर सोशल मीडियाच्या पारतंत्र्यातून त्यांची सुटका करणे खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे.मुलांच्या पंखातील भरारी जोखण्यासाठी मुलांना त्यांचे आभाळ द्यावे "असे प्रतिपादन जि.पो. उपअधीक्षक (लाचलुचपत प्रतिबंधक) विष्णू ताम्हाणे यांनी केले.
जी.एस.ढोरजकर फौंडेशनच्या वतीने बालदिनानिमित्त आयोजित बालभारत कलामहोत्सवाच्या उदघाटनप्रसंगी श्री.ताम्हाणे बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, झीसारेगमप लिटल चॅम्पियन अंजली व नंदिनी गायकवाड, डॉ.अमोल बागूल, सीताराम ढोरजकर, नगरसेविका विना बोज्जा, प्रा.राहुल पाटोळे, श्रीनिवास बोज्जा, आदर्श ढोरजकर, पुष्पा ढोरजकर आदी उपस्थित होते.
यावेळी प्रतिमापूजन, दीपप्रज्वलनानंतर मानपत्र व वृक्ष देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आकांक्षा ढोरजकर यांनी स्वागत केले तर सीताराम ढोरजकर यांनी प्रास्ताविकात फौंडेशनच्या शाळा व उपक्रमांबद्दल माहिती दिली. डॉ. बागूल यांनी गायिका गायकवाड भगिनींच्या घेतलेल्या प्रकट मुलाखतीतून त्यांच्या सांगितीक यशाचा प्रवास उलगडला. श्री चव्हाण यांनी अभ्यास व उत्तम चारित्र्याबद्दल मुलांना माहिती दिली.