डी.एस.कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल
पुणे, दि. 03, ऑक्टोबर - आर्थिक दीत सापडलेल्या डी.एस.कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देणा-या ठेवीदारांची संख्या वाढली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे बुधवारी 258 ठेवीदारांनी फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे. त्यामुळे ठेवीदारांच्या वाढत्या तक्रारीनंतर गुरुवारी (2 नोव्हें बर) सकाळपासून पुणे पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने डी.एस.के यांच्या पुण्यातील आणि मुंबईतील एका ठिकाणावर छापा मारला आहे. या ठिकाणी तपासणी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान छापा पडल्याची माहिती मिळताच अनेक गुंतवणूकदारांनी डी.एस.कुलकर्णी यांच्या जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालयाकडे धाव घेतली. यातील काही नागरिकांशी आम्ही संवाद साधला. त्यापैकी एक गुंतवणूकदार महिला असलेल्या अनुराधा पाध्ये म्हणाल्या मागील सहा वर्षापासून मी डीएसके यांच्या योजनेत पाच लाख रुपये गुंतवले आहेत. मागील मार्च महिन्यापासून मला व्याज मिळाले नव्हते परंतू मागील महिन्यात ते सर्व मला मिळाले. आतापर्यंत आम्हाला व्यवस्थित व्याज मिळाले आहे. यापुढेही ते मिळेल अशी मला खात्री आहे. आपण त्यांना थोडा वेळ द्यावा अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
आणखी एक गुंतवणूकदार असलेले किशोर कुंभोजकर म्हणाले की, माझे दीड लाख रुपये गुंतलेले आहे. मागील वर्षभर त्यांनी व्याज दिले नाही. त्यानंतर त्यांच्याशी बोललो असता सप्टेंबरपासून मुद्दल देणार होते. परंतू अद्यापही ते काही मिळाले नाही. विजय मल्ल्यासारखे कोट्यावधी रुपये बुडवून परदेशात पसार झाले आहेत. परंतु डिएसके असे काही करणार नाहीत. हळुहळू का होईना त्यांनी पैसे परत करावेत.