Breaking News

पोलिस ठाण्यातच सहाय्यक फौजदाराचे ह्रदयविकाराने निधन

सातारा, दि. 07, नोव्हेंबर - पोलिस ठाण्यातच सहाय्यक फौजदाराचे ह्रदयविकाराने निधन झाले. लिंब ता . सातारा येथील रहिवाशी वाठार स्टे. ता. कोरेगाव पोलीस ठाण्यात  सहाय्यक फौजदार आनंदराव जगन्नाथ सरगर ( वय 57 वर्षे ) हे यांना  (दि.5) दहा वाजण्याच्या सुमारास ह्रदयविकाराचा झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले. 
आनंदराव सरगर हे 2012 पासून वाठार स्टे. पोलीस ठाण्यात सहाय्यक फौजदार पदी कार्यरत होते. त्यांनी आजपर्यंत सातारा, रहिमतपूर, कोरेगाव, वाई, पाचगणी, आदी ठिकाणी  सेवा बजावली आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई, दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे.