Breaking News

क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पोला सुमारे 25 हजार जणांनी दिली भेट

सोलापूर, दि. 07, नोव्हेंबर - होम मैदानावर आयोजित क्रेडाई प्रॉपर्टी एक्स्पो 2017 ला तीन दिवसांत 25 हजारहून अधिक ग्राहकांनी भेट दिली. या एक्स्पोमध्ये सोलापूराचा  आढावा घेणारी एक क्लीप दाखवण्यात आली. ही क्लीप युट्यूबवर 60 हजारांहून अधिक लोकांनी पाहली गेली, अशी माहिती क्रेडाईचे अध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी दिली. या  प्रदर्शनास विशेष सहकार्य करणार्‍या स्टॉल बुकिंग कमिटी, मंडप कमिटी, प्रसिद्धी प्रमुख, सुरक्षा विभाग, व्यवस्थापन, स्वागत कक्ष, स्मरणिका काढलेली टीम आदी विभागातील  प्रमुखांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव केला. तसेच उत्तम स्टाल धारकांचाही स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला. प्रदर्शन समारोप कार्यक्रमास पोलिस आयुक्त महादेव तांबडे, पालिक ा उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला. याप्रसंगी एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक किरण निकडे, क्वालिटेक एलिव्हेटर्स संचालक सुभाष कासले उपस्थित होते.  तीन दिवसीय प्रदर्शनात उत्तम बिल्डर्स स्टॉल, बँक, वित्तीय संस्था बिल्डींग मटेरियल आदींची परीक्षण करून नंबर काढण्यात आले. यामध्ये बिल्डर्समधून प्रथम सिनर्जी इन्फ्रा यांनी  पटकावला. द्वितीय विनय ग्रुप तर तृतीय मंगल कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आला. बँक-वित्तीय संस्था स्टॉलमध्ये प्रथम एचडीएफसी होम लोन्स तर द्वितीय अक्सीस बॅक, मटे रियलमध्ये प्रथम बेल सिरामिक्स द्वितीय गुब्बी पेव्हर स्टाईल्स यांनी पटकावला. याचे परिक्षक म्हणून एस. एस. पाटील, अजित हरिसंग विनायक जोशी यांनी केले.