नव्या कलाकारांनी विष्णुदास भावेंची जिद्द, हरहुन्नरीपणा आत्मसात करावा - मोहन जोशी
सांगली, दि. 07, नोव्हेंबर - नाट्यपंढरी सांगलीचा आद्य नाटककार विष्णुदास भावे गौरव पदक मिळाल्याने आता आपल्यावरील जबाबदारी वाढली आहे. विष्णुदास भावे यांचा काळ व सध्याचा काळ यात फार मोठे अंतर आहे. आजच्या कलाकारांनी झटपट यशाचा मार्ग न स्वीकारता विष्णुदास भावे यांच्यातील जिद्द व हरहुन्नरीपणा आत्मसात केला, तर यशाचा मार्ग मिळतो, असे मत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी व्यक्त केले.
अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्यावतीने रंगभूमी दिनानिमित्त मोहन जोशी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांच्याहस्ते विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास ज्योती मोहन जोशी व निर्मला जयंत सावरकर याही उपस्थित होत्या. शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व गौरव पदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
विष्णुदास भावे गौरव पदकाने गौरविण्यात आल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत मोहन जोशी म्हणाले, की आपण अनेकदा नाटक, सिनेमा अथवा अन्य कामानिमित्त सांगलीला आलो. गत दोन दिवसापासूनही आपण सांगलीतच आहोत. मात्र आज नाट्य क्षेत्रातील हा मानाचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर जाताना प्रथमच आपल्या हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. या पुरस्काराने आपल्यावरील जबाबदारीत वाढ झाली असून आपण कमालीचे भारावून गेलो आहे. विष्णुदास भावे पुरस्काराच्या यादीत जयंत सावरकर यांच्यानंतर आपले नाव येईल, याबाबत आपण साशंक होतो. मात्र या पुरस्कारासाठी निवड समितीने एकमताने आपल्या नावाची निवड केली. नाट्यपंढरीतील या पुरस्काराने आपल्या नाट्य जीवनाचे ख-याअर्थाने सार्थक झाले, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.