Breaking News

नागपुरात आजपासून सिनिअर नॅशनल बॅडमिंटन स्पर्धा

नागपूर, दि. 02, नोव्हेंबर - बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाअंतर्गत (बीएआय) 82 वी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा 2 नोव्हेंबरपासून नागपुरात आयोजित करण्यात आली आहे.  या स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन (एमबीए) भूषवणार आहे.
यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना अरुण लाखानी यांनी सांगितले की, भारतीय बॅडमिंटन महासंघातर्फे 82 व्या राष्ट्रीय वरिष्ठ गट बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे  यजमानपद यंदा नागपूरला मिळाले आहे. 2 ते 8 नोव्हेंबर दरम्यान नागपुरात होत असलेल्या या स्पर्धेत देशातील 450 पेक्षा जास्त बॅडमिंटनपटू सहभागी होत आहे. ही वरिष्ठ राष्ट्रीय  बॅडमिंटन स्पर्धा नागपूरमध्ये तब्बल 25 वर्षांनंतर आयोजित करण्यात आली आहे.तब्बल 400 पेक्षा जास्त बॅडमिंटनच्या लढतींचा आनंद नागपुरकरांना लुटता येणार आहे. याशिवाय  नागपुरात कोर्टवर प्रत्यक्ष किदांबी श्रीकांत, ऑलिंपिक पदक विजेत्या पीव्ही सिंधू, सायना नेहवाल या स्टार बॅडमिंटनपटूंना खेळही क्रीडा रसिकांना पाहता येईल.तब्बल 60 लाखांची  बक्षीस रक्कम विजेत्या खेळाडूंना मिळणार आहे.याशिवाय नागपुरचेही विक्रमी अकरा खेळाडू या स्पर्धेत आपला दम दाखवतील.
स्पर्धेत सहभागी होणारे बॅडमिंटन स्टार
किदाम्बी श्रीकांत, पी कश्यप, साई प्रणिथ बी., प्रनॉय एस. एस, सौरभ वर्मा, समीर वर्मा, पी व्ही सिंधू, सायना नेहवाल, रितुपर्णा दास, अनुरा प्रभुदेसाई, अश्‍विनी पोनप्पा