बँक ऑफ महाराष्ट्र दरोडा प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक
पंढरपूर, दि. 03, नोव्हेंबर - बँक ऑफ महाराष्ट्रच्या गाडीवर पडलेल्या 70 लाखांच्या दरोडा प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि गोणेवाडीचे सरपंच रामेश्वर मासाळ यांना अटक करण्यात आली आहे. रात्री उशिरा रामेश्वर मासाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दरोडा प्रकरणातील 6 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रामेश्वर मासाळ यांच्यावर कटात सहभाग असल्याने गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. एबीपी माझाने याबाबत कालच राष्ट्रवादीच्या एका नेत्याचा सहभाग असल्याची माहिती दिली होती. काल रात्री उशिरा मासाळ यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली. अटकेत असलेला रामेश्वर मासाळ हा अजित पवार यांचा कट्टर समर्थक म्हणून जिल्ह्यात ओळखला जात होता.