’गोकुळ’वर मोर्चा, दूध खरेदी दरकपातीचा निषेध
कोल्हापूर, दि. 03, नोव्हेंबर - गायीच्या दूध खरेदीदरात कपात केल्याने काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने गोकुळ दूध संघावर मोर्चा काढला. दूधसंघाबाहेर घोषणाबाजी करुन काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेतकर्यांच्या आर्थिक नुकसानीचा निषेध केला.
दोनच दिवसांपूर्वी गोकुळने गाईच्या दुधाच्या खरेदीत 2 रुपयांची कपात केली आहे. पूर्वी 28 रुपये 50 पैशांनी खरेदी केलं जाणारं गायीचं दूध आता 26 रुपये 50 पैसे झालं आहे. त्याचा थेट फटका शेतकर्यांना बसणार आहे. त्यामुळेच काँग्रेसने ही दरकपात मागे घेण्यासाठी आंदोलन केलं.