Breaking News

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले, 2 जवान शहीद, 2 दहशतवादी ठार

श्रीनगर (जम्मू काश्मीर), दि. 03, नोव्हेंबर - जम्मू-काश्मीरमध्ये एकाच वेळी चार ठिकाणी दहशतवादी घटना घडल्या आहेत. पुलवामा, साम्बुरा गाव, अनंतनाग आणि कुपवाडामध्ये  दहशतवादी घुसले असून, काही ठिकाणी हल्लेही केले. जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराची चकमक झाली. यात दोन भारतीय जवान शहीद  झाले, तर एका दहशतवाद्याचा खात्मा झाला.
श्रीनगरपासून 17 किलोमीटर दूर असणार्‍या पम्पोरमधील सांबुरा गावात दहशतवादी शिरल्याची माहिती मिळाली असून, भारतीय जवानांनी तिथेही सर्च ऑपरेशन सुरु केले आहे.  अनंतनागमध्ये सीआरपीएफच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये एक भारतीय जवान जखमी झाला आहे, तर एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात यश मिळालं आहे.