Breaking News

आशुतोष काळेंची उपाध्यक्षपदी निवड

अहमदनगर, दि. 01, नोव्हेंबर - आशिया खंडातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणा-या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे यांची नुकतीच दि डीस्टीलर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.  दि डीस्टीलर्सअसोसिएशन ऑफ महाराष्ट्र,मुबई ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच अकलूज येथे पार पडली. अतिशय कमी वयात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी अतिशय समर्थपणे सांभाळून कारखान्याचे चेअरमन युवा नेते आशुतोष काळे कारखान्याला वेगाने प्रगतीच्या दिशेने घेवून जात आहे, त्यांच्या कार्याची दखल घेवून अकलूज येथे पार पडलेल्या या सभेत एकमताने त्यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर अध्यक्षपदी श्री. विजयसिंह मोहिते पाटील यांची व खाजगी डीस्टीलरीचे श्री. कनु  कलांनी यांचीही उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अमेरिकेत राहून उच्च शिक्षण घेवूनही समाजकारणाचा वसा जोपासत स्व. माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आशुतोष काळे माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा उत्तम कारभार कसा करावा हे दाखवून दिले.