Breaking News

भिंगार बँकेने कार्यकौशल्याने वेगळा ठसा उमटविला - आ. संग्राम जगताप

अहमदनगर, दि. 01, नोव्हेंबर - सध्या सहकारी संस्था आणि सहकारी बँका या अडचणींचा सामना करत आहेत. परंतु ज्या संस्थेची उभारणी एका ध्येयाने आणि प्रामाणिकपणे वाटचाल सुरु आहेत, त्या संस्था प्रगती करत आहेत. सध्या शासनाच्या दिवसेंदिवस बदलत चाललेल्या धोरणामुळे व नवनवीन जीआरमुळे सर्वच जण एक प्रकारे चक्रावून गेले आहेत. यासर्वांवर मात करुन भिंगार बँकेने आपल्या कार्यकौशल्याने वेगळा ठसा उमटविला, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
भिनगर अर्बन बँकेच्या बोल्हेगांव येथील नवीन इमारतीचे लोकार्पण आणि एटीएम सुविधाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.  याप्रसंगी माजी आ. पांडूरंग अभंग, शिवसेना उपनेते अनिल राठोड, बँकेचे अध्यक्ष गोपाळराव झोडगे, उपाध्यक्ष किसनराव चौधरी, नगरसेवक गणेश कवडे, सागर बोरुडे, आशा बडे, दत्ता सप्रे, मदन आढाव, मुख्य कार्यकारी अधिकारी पांडूरंग हजारे आदींसह संचालक उपस्थित होते.
पुढे बोलतांना आ. जगताप म्हणाले, की बोल्हेगांव परिसरात बँकेने शाखा सुरु करुन एमआयडीसी, बोल्हेगांव, नागापूर, वडगांवगुप्ता येथील उद्योजकांबरोबरच कामगारांना सुविधांद्वारे मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला आहे.  त्यातून बँकेची एक चांगली प्रतिमा निर्माण होईल, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी माजी आ. पांडूरंग अभंग म्हणाले, 109 वर्षांची परंपरा असलेल्या या बँकेने अखंडीपणे सेवा देण्याची जी परंपरा सुरु ठेवली आहे, ती खरोखर उल्लेखनिय आहे.  सध्याच्या काळात सर्व शाखांमध्ये स्वत:ची गुंतवणुक करणे हेही एक
जिकरीचे काम आहे. लोकांमध्ये विश्‍वास संपादन करुन बँकेची प्रतिमा उंचवत आहे. यावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड म्हणाले, भिंगार बँकेने जी प्रगती साधली, त्यासाठी त्यांचं सक्षम असे नेतृत्व कारणीभूत आहे. सर्व संचालकांना विश्‍वासात घेऊन बँकेचे हिताचे निर्णय घेऊन सभासद, ठेवीदार, कर्जदारांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल, हे पाहिले आहे. यावेळी बँकेचे अध्यक्ष गोपाळराव झोडगे म्हणाले की, बँकेने 24 तास एटीएम, सर्व शाखांमध्ये आरटीजीसए, एनईएफटी, सीटीएस चेकबुक, एसएमएस स्टेटमेंट, ड्राफ्टची सुविधा, सोने तारण, लॉकर, ठेवींना विमा संरक्षण आदि सुविधा देऊन सर्वांना अत्याधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी सर्व संचालकांचे मोठे सहकार्य मिळत असते. कर्मचार्यांचा प्रामाणिकपणा आणि ग्राहकांच्या विश्‍वासावर बँक आज प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्तविक उपाध्यक्ष किसन चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र शिंदे यांनी केले. कार्यक्रमास संचालक रमेश परभाणे, कैलास खरपुडे, विजय भंडारी, अमोल धाडगे, तिलोत्तमा करांडे, अनिल झोडगे, राजेंद्र पतके, संदेश झोडगे, विष्णू फुलसौंदर, एकनाथ जाधव, कांताबाई फुलसौंदर, नामदेव लंगोटे, आर. डी. मंत्री, राजेंद्र बोरा, एम. वाय. कुलकर्णी, कैलास मोहिते, अशोक कानडे, तुकाराम तुपे, उद्योजक डोके, संजय घुले आदींसह सभासद, ठेवीदार, कर्जदार, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.