सिध्दनाथाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात रथोत्सव उत्साहात
सातारा, दि. 20, नोव्हेंबर - सिध्दनाथाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात व लाखो भाविकांच्या उपस्थितीत श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या रथावर गुलाल खोबर्याची उधळण करीत रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला.
अखिल महाराष्ट्र तसेच आंध्र, कर्नाटक या राज्यातील अनेक भाविकांचे श्रध्दास्थान व दैवत असणार्या म्हसवड येथील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी यांच्या उत्सवमूर्ती सालकरी यांच्या घरुन वाजत-गाजत रथामध्ये बसवण्यात आल्या. रथामध्ये उत्सवमूर्ती बसवल्यानंतर श्रींच्या मूर्तींच्या रथातून मिरवणुकीस प्रारंभ झाला.

रथावर बसण्याचा मान राजेमाने घराण्याचा असून अजितराव राजेमाने, बाळासाहेब राजेमाने, पृथ्वीराज राजेमाने, सयाजी राजेमाने, विजयसिंह राजेमाने, गणपतराव राजेमाने, शिवराज राजेमाने, तेजसिंह राजेमाने, दिपसिंह राजेमाने, शहाजीराजे राजेमाने, विश्वजित राजेमाने तसेच बाळासाहेब माने,माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, दादासाहेब कांबळे,पोलीस उपविभागीय अधिकारी यशवंत क ाळे,तहसीलदार सुरेखा माने,मुख्याधिकारी पंडित पाटील,सपोनि मालोजीराव देशमुख यांच्या उपस्थित रथोत्सवास प्रारंभ झाला.