Breaking News

जवान नीलेश चव्हाण यांच्यावर अंत्यविधी पार

सातारा, दि. 20, नोव्हेंबर - जब तक सूरज चाँद रहेगा नीलेश तुम्हारा नाम रहेगा भारत माता की जय या घोषणा देत फलटण तालुक्यातील तरडगाव येथील जवान नीलेश चव्हाण यांच्या पार्थीवाची अंत्य यात्रा काढित अंत्य विधी पार पाडण्यात आला.


पंजाब येथील भटिंडा या ठिकाणी देश सेवेसाठी कार्यरत असताना शुक्रवारी हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने जवान नीलेश चव्हाण यांचे निधन झाले होते. शुक्रवार पासून तरडगाव कर पार्थीवा च्या प्रतीक्षेत होते आज रविवारी सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी पार्थिव दाखल झाले हे पार्थिव प्रकाश पुजारी या सुभेदार यांनी आणले. गावांत पार्थिव आल्याची खबर मिळाल्याने सपूर्ण गावच एका ठिकाणी एकवटला गेला तर जवान नीलेश चव्हाण यांच्या कुटुंबातील पत्नि आई वडील यांनी अश्रुंचा हंबरडा फोडला. 

सकाळी 8.30 वाजता अंत्य यात्रेला सुरुवात झाली सजविलेल्या ट्रॉलीत गांवांतुन घोषणा देत अंत्य यात्रा काढण्यात आली. पालखी तळ या ठिकाणी शेवटी पार्थिवाला मुलगा आदर्श याने अग्नि दिला. शोकाकुल झालेल्या वातावरणात संपूर्ण तरडगाव गहिवरुन गेले. आर्मी त भरती होण्या साठी धडपड करणारे तरुण मुले ही हा अंत्य विधी पाहताना ग हिवरले तसेच शालेय विद्यार्थी यांनी अंत्य यात्रेत सहभाग दर्शविला.