दीपिका पादुकोणचा शिरच्छेद करणाऱ्यास भाजप नेता देणार १० कोटीचे बक्षीस
दीपिका पादुकोणचा शिरच्छेद करणाऱ्यास 10 कोटीचे बक्षीस देऊ, आणि त्याच्या कुटुंबाची सर्व व्यवस्था करु, असं वादग्रस्त वक्तव्य हरियाणा भाजप प्रदेश मीडिया संयोजक सूरज पाल अम्मू यांनी केलं आहे.
पद्मावती सिनेमावरुन सुरु असलेला वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. आधीच सिनेनिर्मात्यांकडून स्पेशल मीडिया स्क्रीनिंगमुळे सेन्सॉर बोर्डाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख लांबणीवर टाकावी लागली आहे.
या सगळ्या प्रकरणात पंतप्रधानांवरही हल्ला चढवला जातोय. पाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही जोरदार हल्ला चढवला जातो आहे. मोदींना उद्देशून पाल म्हणाले की, मतांसाठी राजपूत, मुस्लीमांवर जरब बसवण्यासाठी राजपूत, आणि मतं मिळाल्यानंतर, याच राजपूतांचा अपमान होतोय.
