Breaking News

राष्ट्रीय फेलोशिपचा शशिकांत पाटील यांना मिळाला बहुमान

बुलडाणा, दि. 07, नोव्हेंबर - तालुक्यातील बेलाड येथील आदिशक्ती बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत सांबारे (पाटील) यांनी संस्थेमार्फत विदर्भात बुलढाणा, अक ोला, अमरावती, यवतमाळ तसेच खान्देशातील जळगांव खानदेश या जिल्ह्यातील शेतकार्यांमध्ये सेंद्रिय शेती विषयी जागरूकता निर्माण करण्याचे काम गेल्या सतरा वर्षांपासून अ विरत करत आहेत. यामध्ये शेतकर्यांना त्यांनी आपल्याच शेतावर सेंद्रिय खते बनविणे, सेंद्रिय खतातील घटकांचे प्रमाण व पीक निहाय देण्याचे प्रमाण तसेच फवारणीतून कीड  व्यवस्थापन व पोषक आहाराच्या वापराबाबत माहिती देण्याचे काम शशिकांत सांबारे पाटील यांनी केले.
आदिशक्ती बहुउद्देशीय संस्थे मार्फत शेतकर्यांना देण्यात येणार्या मोफत सेवेमुळे विदभार्तील अनेक शेतकरी संस्थेमध्ये सहभागी झाले व आपल्याच शेतावर सेंद्रिय उत्पादन तयार करू न स्वत:च्या शेतावर वापरायला लागले. त्यामुळे त्यांच्या जमिनीमध्ये सुधारणा होऊन उत्पादन खर्चत बचत होऊ लागली व येणारे उत्पादन पोषक व चविष्ठ येऊ लागले. त्यांच्या  कार्यावर प्रभावित होऊन त्यांची निवड चेन्नई नॅशनल व्हचरुअल अकॅडमी फॉर रूरल, जमशेदजी टाटा ट्रेनिंग स्कूल व डॉ एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन चेन्नई यांच्या संयुक्त  विध्यमाने देण्यात येणार्या फेलोशिप साठी करण्यात आली आहे. हा बहुमान शशिकांत सांबारे यांना चेन्नई येथे नुकत्याच पार पडलेल्या सन्मान वितरण सोहळ्यात डॉ व्ही सेलवाम, राष्ट ्रीय अकॅडमीचे अध्यक्ष डॉ ब्रुश अल्बर्ट अमेरिका, डॉ. प्रा. एम. एस. स्वामिनाथन (शेतकर्यांना उत्पादन खर्च अधिक 50% नफा द्यावा, असा अहवाल सादर करनारे) यांच्या हस्ते  प्रदान करण्यात आला.