माकड म्हणते माझीच...
कुमार कडलग/ नाशिक, दि. 04, नोव्हेंबर - माणसाचे वय वाढत जाते तसतशी त्याची शारिरीक मानसिक,बौध्दीक प्रगती होत जाते.काळानुरूप परिस्थितीशी जुळवून घेत तो स्वतः मध्ये बदल करून घेतो. माणसाच्या या प्रगतीत अनेक घटकांचा सहभाग असतो. या मार्गावरून माणूस इथपर्यंत पोहचला आहे.माणूस माकड वंशाचा... हळूहळू त्यात बदल होत गेला आणि माकडाचा माणूस झाला. अशी उत्क्रांती प्रमेयाची धारणा आहे.
अथ पासून इथ पर्यंतच्या या प्रवासात माणसाने काळाला अनूरूप असे बदल स्वतःमध्ये करून घेतले.कधी स्वबळावर तर कधी इतरांच्या मदतीने आवश्यक ती प्रगती माणसाने साधली.या प्रगतीला तो कारणीभूत आहे, पण सभोवतालची परिस्थिती, त्या काळातील गरज आणि तत्कालीन यंञणा अथवा व्यक्तीगत पातळीवर झालेली मदत एका मर्यादे नंतर तो विसरतो. प्रगतीच्या सुजेमुळे निर्माण झालेला अहंकार माणसाला या पायरीवर आणतो.
एखाद्या राष्ट्राचा विकास होत असतांना ही बाब तेव्हढीच लागू पडते. आपण राष्ट्र म्हणून भारत असा उल्लेख करणार्या या देशाचा प्रवासही याच मार्गावरून झाला आहे.स्वातंञ्यापुर्वी या भुमीवर तत्कालीन परिस्थितीला पुरक असलेला विकास होत होता. राजेशाहीत तेंव्हाच्या उपलब्ध तंञज्ञान, ज्ञान, माहीती, मनुष्यबळ यासारख्या यंञणेचा वापर करून तत्कालीन रयतेच्या गरजा पुर्ण होतील असे धोरण ठेवून ही भुमी प्रगती करीत होती.
ब्रिटीश काळ आणि आधीचा राजेशाहीचा काळ यात विकासाच्या पातळीवर दिसणारा मुलभूत फरक उपलब्ध व्यवस्थेशी संबंधित आहे.एका राजवटीतून कुठलेही राष्ट्र संक्रमीत होत असतांना कालहरण होत असते.कालहरणासोबत परिस्थिती बदल जाते. कधी आनुकूल तर कधी परिस्थितीशी जुळवून घेत तत्कालीन राज्यकर्ते राज्याचा विकासाचा गाढा ढकलीत असतात.स्वातंञ्याआधी किंबहूना ब्रिटीश राजवट येण्याआधी या भुमीवरील प्रत्येक स्वदेशी राजवटीने तळागाळातील रयतेचा विचार करून विकासाचे धोरण ठेवले. या धोरणात आधीच्या किंवा प्रतिस्पर्धी राजवटीच्या कारभाराविषयी आकस दिसला अशी नोंद इतिहासात सापडत नाही. अर्थात आजच्यासारखी सत्तेची स्पर्धा तेंव्हाही होतीच पण रयतेची दिशाभूल करून, भुलथापा देऊन, प्रतिस्पर्ध्यावर कमरेखालचे वार करून सत्ता मिळवण्याची कुटील निती तेंव्हा नव्हती.
आज आपण स्वतंञ झालो.त्यानंतर बदलणार्या परिस्थिती सोबत सारे बदलले.देशाच्या विकासाशी थेट संबंधी ध असलेले सत्तेच्या राजकारणात तर हिणकस बदल झाला.गेल्या सत्तर वर्षाच्या देशाच्या विकासाच्या प्रवासात अनेक वाटसरूंचा सहभाग आहे. या देशाचा विकास झालाच नाही असे म्हणण्याचे धाडस करणारा एकतर पढत मुर्ख असेल किंबहूना श्रेयवाटपात कंजूष तरी.
हा देश स्वतंञ झाल्यापासून प्रत्येक क्षणाला विकासाच्या मार्गावर धावतो आहे.तत्कालीन परिस्थितीशी जुळवून घेत उपलब्ध संसाधनांचा वापर करून प्रगती सुरू आहे.काळानुरूप नवेनवे तंञज्ञान, त्यातून निर्माण होणारी संसाधने प्रगतीच्या वेगावर प्रभाव टाकीत आहेत.याचा अर्थ हा देश अचानक प्रगती प्रथावर वाटचाल करू लागला असा होत नाही.शंभर पाऊ लावर जे प्राप्त झाले त्याचा हिशेब मांडतांना या स्थळावर पोहचण्यासाठी पडलेले पहिले पाऊल विसरता येणार नाही. प्रत्येक पाऊलाचा शंभराव्या पावलाच्या यशात तितकाच वाटा असतो. हे वास्तव आज नाकारले जात आहे.अमुक एका पक्षाच्या राजवटीत देशाचा विकास झाला नाही.असे म्हणण्याची प्रथा आणि स्पर्धा राजकीय पक्षांमध्ये वाढली आहे.त्यातून राजकारण दुषीत बनले आहे.मनाला येतील त्या थापा मारल्या जाऊ लागल्या आहेत. या थापा मारण्यासाठी वापरल्या जाणार्या साधनांची पार्श्वभूमी कुणी दिली यावर मंथन झाले तरी राजकारणातील दुषीतपणा काही अंशी का होईना निवळण्यास मदत होईल.
मनं दुषीत करणार्या आजच्या राजकारणाला जनता तर विटली आहेच पण आपले पुर्वज असलेले माकडंही राजकारणाकडे पाहून हसू लागली आहेत. राजकारणातील चाळे पाहून हसणारी ही माकड माणसाला वाकूल्या दाखवून चिडवून म्हणू लागली, शेवटी तू माझीच पिलावळ.......
आजच्या राजकारणातील मर्कट लिला बघून माकडही हसत आहे.या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारत मारत पहिल्या फांदीच्या काड्या कुरतडणारी राजकीय प्रवृत्तीला बघून माक ड खजील होत म्हणते माणसा! तु माझीच पिलावळ.